पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/23

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कालगणनेची समजूत

मुसलमानी व मराठी विभागांतील पत्रे व उतारे वाचतांना त्यांत कालनिदर्शक येणारे शब्द समजण्यासाठी त्रोटक माहिती.

मुसलमानी महिने

 1. मोहरम
 2. सफर
 3. रबिलावल
 4. रबिलाखर
 5. जमादिलावल
 6. जमदलाखर
 7. रजब
 8. साबान
 9. रमजान
 10. सवाल
 11. जिल्काद
 12. जिल्हेज

मुसलमानी महिन्याच्या तारखांना चंद्र म्हणतात. सुहुर सन पत्रांतून सु।। असा लिहिला जातो. मुसलमानी सनाचे आकडे शब्दांत लिहीत ते येणेप्रमाणे

 • इहिदे = १
 • इसने = २
 • सलास = ३
 • आर्बा = ३
 • खमस्स = ५
 • सीत = ६
 • सबा = ७
 • समा =८
 • तिसा =९
 • अशर = १०
 • अशरीन = २०
 • सलास्सीन = ३०
 • आर्बेन = ४०
 • खमसैन = ५०
 • सीतैन = ६०
 • सबैन = ७०
 • समानीन = ८०
 • तिसैन = ९०
 • मया = १००
 • अलफ = १०००
 • मयातैन = २००

उदाहरणार्थ, सबा मयातैन व अलफ=७ + २०० + १००० = १२०७ सुहुर सनांत ५९९ किंवा ६०० मिळविल्याने इसवी सन येतो, म्हणून उपरोक्त वर्ष इ. स. १८०६ किंवा १८०७ असू शकेल. नुसते अलफ असे असलेले पत्र १६०० ते १७०० या कालांतील म्हणजे शिवकालीन, मया व अलफ असे असलेले पत्र १७०० ते १८०० या कालांतील म्हणजे पेशवाईतील व मयातैन व अलफ असे असलेले १८००-१९०० चे म्हणजे उत्तरपेशवाई किंवा अव्वल इंग्रजींतील साधारणतः समजावें.