संभाजीच्या कारकीर्दीतील घडामोडी
१९५
२० :: संभाजीच्या कारकातील घडामोडी
[ मराठी इतिहासाच्या साधनांत समकालीन अस्सल पत्राइतकें नसले तरी त्याच्या खालोखाल समकालीन शकावलींना महत्त्व आहे. या शकावल्या पूर्वी प्रत्येक मोठ्या घराण्यांत तयार करीत. जेधे
शकावली अशापैकीच आहे. ही लो. टिळक यांनी प्रथम उजेडात आणली.] शिवचरित्र प्रदीप पृ. ३१-३४ ] ।
[ जेधे शकावली शके १६०३ जेष्ठ मासी सुलतान अकवरशाह जाला औरंगजेवावर यागी होऊन त्रिंबकास आले त्यास संभाजी राजे याणी कोकणांत पालीस ठाव दिल्हा २.
भाद्रपद मासी संभाजी राजे याणी कवि कळशाचा बोले मागती आणाजी दतो सचीव यांजवर ईतराजी करून भार दिल्हा त्या माराने राजश्री आनाजीपंत व बाळ प्रभु व सोमाजी दत्तो व हिराजी फर्जंद परळी खाले कैद करून मारिले. कर्णाटकांत शामजी नाईक यास कैद करविले १.
कार्तिक शुध १३ रविवार पातशाहापूरी संभाजी राजे यांची व अकबराची भेटी जाली अगदीं सेना समुदाये लश्कर व हशम देखील समागमे होते अकबरा समागमे दुर्गादास होता बहुत सन्मान केला.
(शके १६०५) जेष्ठ वद्य ११ संभाजी श्वार होऊन राजापूरास गेले फिरंगीयासीहि बिघाड केला. रेवदंडीयासी वेढा घातला १
आशाढ सुध पोर्णिमा जनार्दन नारायेण याणी देवरूखी देह ठेविला कार्तीक वद्य ७ संभाजी राजे हंडियास गेले गावीकर फिरंगी यानी कोटास वेढा घातला होता. त्यासी लढाई करून वेढा उठविला तेथे येसाजी कंक व त्याचा लेक कृष्णाजी कंक याणे युद्धाची शर्त केली १ मार्गषीर्ष मासी फिरंगीयाचे कुंभार जुवे घेतले साष्टी व बरदेस मारिला १ ।
(शके १६०७) आषाढ मासी संभाजी राजे याणी विजापूरचे मदतीस कबजीस पाठविले ते जाळून पनाला राऊन फौजा रवाना केल्या १ फालगुण मासी अकवर जाजाप्त बैसोन विरानांत गेला.
(शके १६१०) माघ वद्य ७ शुक्रवासरी संभाजी राजे व कवि
१ रुष्ट. २ इराणांत.
[ ३९
पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/224
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
