१९४ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास रचून यथोचित सर्वापासून स्वामिकार्य घेत हे स्थळ म्हणजे धन्याने ही परमप्रिय ठेवी दिली आहे, आपले प्राणान्त यास दगा होऊ नये, असे पूर्ण चित्तांत आणून जे धन्यांनी लावून दिली मर्यादा तीस तिळांग अंतर पडों न देतां, दिवसाचा उद्योग दिवसा रात्रीचा उद्योग रात्रीं, निरालस्यपणे करून सर्व प्रयत्ने स्थळ जतन करीत, असे ठेवावे. गडास यावयाचे मार्ग असतील ते सुगम नसावे. सुगम असले तर ते मार्ग मोडून त्यावर झाडी वाढवून आणखी कडे पर फौजेस येतां कठीण असे मार्ग घालावे. या विरहित बलकुबलीस चोरवाटा ठेवाव्या. त्या सर्वकाळ चालू देऊ नयेत. समयास तेच खिडी अथवा दरवाज्याचा राबता करून सांजवादा चढवीत जावा. तसेच गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा पाणी नाहीं आणि ते स्थळ आवश्यक वांधणे प्राप्त झाले तरी आधीं खडक फोडून तळी, टांकी पर्जन्यकाळपर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरे अशी मजबुत वांधावी. गडावरी झराही आहे, जसे तसे पाणीही पुरते, म्हणून तितकियावरीच निश्चिती न मानावी. किनिमित्य कीं, झुंजामध्ये भाडियांचे आवाजाखाली झरे स्वल्प होतात, आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो, तेव्हां संकट पडते. याकरिता तसे जागी जखिरीयाचे पाणी म्हणून दोन चार टाकीं तळीं वांधावी. त्यांतील पाणी खर्च होऊ न द्यावे, गडाचे पाणी बहुत जतन राखावे. गडावरी राजमंदिराविरहित थोर इमारतीचे घर बांधों नये. दारुखान्यास नेहमीं राखणेस लोक ठेवावे त्यांणी रात्रंदिवस पाहायाप्रमाणे जागत जावें. परवानगी विरहित आसपास मनुष्य येऊ न द्यावे. गड पाहून गडाचे नाजूक जागे पाहून, त्या त्या जागी व गडाचे उपराचे' जागा, त्या त्या सारिखीं भांडीं, जंवरे चरक्या' आदिकरून यंत्रे बुरजा बुरजास तटोतट टप्पे गुजरे १ ° बांधून ठेवावी. अभ्यास :-क्रमांक व ९ ते १९ चे उतारे वाचून त्या प्रत्येकांत दिसून येणा-या शिवाजीमहाराजांच्या एकएक गुणाचे स्वतंत्र टाचण करा व नंतर त्यावरून शिवकालीन राजवटीबद्दल एक सुसंगत चिकित्सक टिपण तयार करा १ इतर बाजूंनीं. २ संकटाच्या प्रसंगीं. ३ वहिवाट. ४ (?) ५ तोफांचे आवाज. ६ सांठविलेले. ७ वरच्या जागीं. ८ जंबुरे-लांबतोफा. ९ धार लावण्याचे यंत्र, चरक. १० मोर्चे. ३८]
पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/223
Appearance