पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इ १९० हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास ऐशीं स्थळे दुर्घट करावीं ऐसें जें जे मनीं धरिलें तें तें स्वामींनी आशीर्वाद प्रतापें मनोरथ पूर्ण केले. | याउपरि राज्य सर्वे संपादिलें तें चरणी अर्पण करुनु सर्वका सेवा घडावी ऐसा विचार मनी आणिला तेव्हां आज्ञा जाहली की, “ तुम्हांस पूर्वी धर्म सांगितला तेच करावेस तीच सेवा होय, ' ऐसे आज्ञापिलें. | यावरून निकटवास घडुनु वारंवार दर्शन घडावें; श्रीची स्थापना कोठे तरी होउनु सांप्रदाय शिष्यभवती दिगंत विस्तीर्ण घडावी : ऐसी प्रार्थना केली. तेही आसमंतात गिरिगव्हरी वास करुनु चाफळीं श्रीची स्थापना करुनु सांप्रदाय शिष्य दिगंत विस्तीर्णता घडली.३ । शिवाजीची साक्षरता [छत्रपति शिवाजी महाराजांना लिहितां वाचतां येत नव्हते, सही करण्यासही येत नव्हती असे आँट डफ या इंग्रज इतिहास लेखकानें लिहिले. याबद्दल त्याने पुरावा कांहींच दिला नाही. त्याचे म्हणणे खोडून काढण्यासाठी मात्र पुरावे देणे आवश्यक झाले ! त्या दृष्टीने पुढील पत्रांचा उपयोग आहे. पत्रे इंग्रजी पत्रव्यवहारांतील व समकालीन असल्याने डफच्या मताचे परस्परच खंडन होत आहे. हीं पत्रे शिवकालीन पत्रसार संग्रह' यांतून घेतली आहेत. पत्राचे क्रमांक त्यांतील आहेत. या पत्रांत शिवाजीने स्वतः पत्र लिहिलें, पत्र त्याच्याच हातांत द्यावे, शिवाजीच्या सहीचे कागद आले इ. वाक्यावरून स्पष्ट होते कीं : शिवाजी लिहीत असे, वाचीत असे व सहीहि करीत असे. ' लेखनालंकार' या पुस्तकांत संपादक श्री. आबा चांदोरकर यांनी शिवाजीच्या हस्ताक्षराचे पत्र छापलें आहे, पण ते मूळ पत्र सांपडत नसून त्याची नक्कल असल्याने ते प्रमाण मानणे अवघड जाते.] नं. ८४८ -१- गेल्या वर्षी दंडराजपूर किल्ला घेण्याबद्दल खुद्द शिवाजीजवळ बोलणे १० जून १६६१ । झाले ते त्याचा नोकर दौरोजी याचे मध्यस्थीनेच झाले. शिद्दीकडूम तो १ अवघड. २ गुहा. ३ सांप्रदाय व शिष्य चारही दिशास विस्तार पावले. ३४ ]