पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/217

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८८ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास वालगोडपुरास आले. तुमचे लोक चालून आल्यावर तुमचे आमचे लोकांत थोर झगडा झाला. तुमचे लोक पराजय पावले. प्रतापजी राजे व भिवजीराजे* व शिवाजी डबीर असे तिघे धरिले; व किती एक लोक मारिले. किती एक लोक पळून दाणादाण होऊन गेले. ऐसा समाचार ऐकिला. हे ऐकून बहुत नवल असे वाटले, की कैलास वासी महाराज, त्यांचे तुम्ही पुत्र, बहुत थोर लोक, असे असून कांहीं विचार करीत नाहीं. वैसे असतां कस्टी° व्हाल याचे नवल काय ? तुम्ही म्हणाल की काय विचार करावा ? तरी ऐसा विचार करावा होता की, श्री देवाची कृपा व श्रीची कृपा त्यांवरी पूर्ण झाली आहे, दुष्ट तुरुकाला ते मारितात. आपल्या सैन्यांत तुरुक लोकच असतां जय कैसा होता आणि तुरुक लोक कैसे वाचू पहातात. हा विचार करावा होता; आणि युद्धाचा प्रसंग पाडावा नव्हता. परंतु दुर्योधनासारखी बुद्धि करून युद्ध केले आणि लोक मारविले. जे जाहलें ते जाहले. पुढे तरी हट न करणे. तेरा वर्षे तुम्ही सारें राज्य खादलें तें खादलें. या उपरी कितेक आमचे आम्ही घेतले असे. अरणी, बंगलूर, कोलार, होसकोट, शिराळकोट व किरकोळ जागे व चंजाऊर असे जे जागे तुमचे हातीं उरले आहेती, ते आमचे लोकांचे हाती देणे. आणि नकद १ पैके व जडाव १ २ व हत्ती व घोडे यांचा अर्धा वांटा देणे. ऐसा विचार करून आम्हांसी संधि करणे. तुम्हीं ऐसा संधी निर्मलपणे केलीया आम्ही आपणापासून तुम्हांला तुंगभद्रे अल्याड १३ पन्हाळे प्रांतें तीन लक्ष होनांची देशून अथवा आम्हांजवळील दौलत तुम्हांला मानेना, तरी कुत्बशहास अर्ज करून त्यापासून तुम्हांस तीन लक्षांची दौलत देववून १५ असे दोनही विचार तुम्हास लिहिले आहेत. या दोनही मधील एक मनीं धरून मान्य करणे, हटाचे हाता न देणे.१६ आपल्यांत आपण गृहकलह करावा आणि कष्टी व्हावे याचे काही प्रयोजन नाहीं या उपरी तन्ही आमचा आपला संधी व्हावा वैसी बुधी मना धरून वांदियाचा वेव्हार निर्गमून टाकणे १७ आणि सुखें असणे. गृहकलह

    • प्रतापजी, भिवजी, संताजी व रायभानजी काका असे शहाजीच चार दासीपुत्र नमूद आहेत, संताजी प्रथमपासूनच शिवाजीस सामील होता.

१० कष्टी. ११ नगद, रोख. १२ सोन्याचे जिन्नस. १३ अलीकडे. १४ देऊ १५ देववं. १६ हट्टाचे भरीस पडू नका. १७ निकालात काढणे. ३२ ]