अग्न्याहून सुटका
१८१
अग्न्याहून सुटका [कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या शिव-चरित्रास सभासदी बखर असे म्हणतात. बखरीतील सर्वच वृत्त विश्वसनीय व कालानुक्रमानुसार असतेच असे नाही. शिवाय चरित्रनायकासंबंध अद्भुत गोष्टीहि त्यांत असतात. समकालीन आधारानें वखरींतील वर्णनास जेथे पुष्टी मिळते तेथे ते वृत्त सत्य समजण्यास प्रत्यवाय नाहीं. शिवाजीसंबंधीं ज्या बखरी उपलब्ध आहेत त्यांपैकी प्रस्तुत बखर विशेष विश्वसनीय आहे, कारण शिवाजीच्या कारकीर्दीत सुभेदाराचे काम केलेल्या कृष्णाजी अनंत सभासद याने ही लिहिली व तोहि शिवाजीच्या मृत्यूनंतर १७-१८ वर्षानींच. कृष्णाजी अनंत हे थोरले राजाराम महाराज यांच्या पदरीं सभासद होते. ( थोरले महाराज म्हणजे शिवाजी राजे यांचे वृत्त प्रथमपासून विदित, करावे, अशी राजाराम महाराज यांनी विनंति केल्यावरून हे चरित्र तंजावर येथे कृष्णाजी यांनी लिहिलें. | सभासद बखर, पेशव्यांची बखर, भाऊसाहेबांची बखर इ. अनेक मराठी बखरी प्रकाशित करण्याचे महत्त्वाचे कार्य काशीनाथ नारायण साने, बी. ए. यांनी केलेले आहे. एकाच पुस्तकाच्या अनेक हस्तलिखित प्रती त्यांनी मिळविल्या (कारण तत्कालीं छापण्याची पद्धति नसल्याने अशा ग्रंथाच्या हस्तलिखित प्रती सरदार घराण्यांतील पुस्तकसंग्रहांत ठेवलेल्या असत. सुवाच्य अक्षरांत ग्रंथाच्या प्रती करून त्या विकणे हा एक महत्त्वाचा धंदा त्या काळीं चाले.) त्यावरून मूळ लेखन
शुद्ध करून अर्थ निर्णायक व अवांतर माहितीच्या विपुल टीपास" साने यांनी बखरींचे प्रकाशन केले आहे.
प्रस्तुतचा उतारा हा सभासद बखर, आवृत्ति चौथी, इ. स. १९२३, मधील पृ. ५०-५२ वरील आहे. !
...मग एके दिवशीं राजे व राजपुत्र एकच पेटारियांत बसले. पुढे मागे पेटारे करून मध्ये पेटारियांत बसून चालिले. ते वेळी आपला साज सर्व उतरून, हिरोजी फरजंद यास घालून, आपले पलंगावरि निजविला. हात मात्र त्याचा उघडा बाहेर दिसू दिला आणि शेला पांघरून निजविला. आणि एक पोरगा रगडावयास ठेवला. जवळील कारकून होते त्यांस अगोदर दिल्लीपलीकडे तीन कोसावर एक गांव होता तेथे ठिकाण करून पुढे रवाना केले होते. आणि
१२. सा.इ.
[२५
पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/210
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
