१. किल्ल्यावर वसाहती. १७९ १२ । । । । किल्ल्यावर वसाहती | शिवाजचे बाजी प्रभूस पत्र [ संशोधक : कै. स. ग. जोशी, शिवाजी सोव्हेनीर, मराठी विभाग पृ. ११९ वरून ]. माा अनाम* बाज प्रभु प्रती राजेश्री सीवाजीराजे सुाा तिसा खमसैन अलफ जासलोहगड हिरडस मावलमधे आहे. तो गड उस पडला होता. याचे नाव मोहन गड ठेउनु किला वसवावा यैसा तह करून किल्यास मसुरल अनाम पिलाजी भोसले यासि किले मजकूरचा हवाला देउनु पाठविले असेत व माा इलेबराबर किलाचे संगनाती बदल लोक २५ पाठविले असेत. तरी तुम्ही माा इळेस व पंचविसा लोकास बराबर घेउनु मोहनगड गडावरी जाउनु हवालदारास व पंचविसा लोकास किल्यावरी ठेवणे आणि किलाच्या हवालदारास घर व लोकास अलंगा मजबूत करून देणे. घर व अलंगा करून द्याल त्या पाउसाने अजार न पावे असा करून देणे. नाहीं तरी सजवज करूनु द्याल आणि किल्यावर लोक रहातील त्या आजार न पावे यैसे हवालदारास घर व लोकास अलंगा व एक भाखळ' मुस्तेद' करूनु देणेचे. तुम्ही सदरहु प्रमाणे काम विलेवार ° लाउन द्याल म्हणउनु साहेबास भरवसा आहे. याबद्दल तुम्हांस लिहिले असे तरी सदहूं लिहिले प्रमाणे किला मजबूद करूनु देणे मग तुम्ही किल्याखालि उतरणे छ १ रमजानु मोर्तब सुद'२ मर्यादेयं विराजते. शके १५८१ विकारी संवत्सर जेष्ठ शुद्ध २ शुक्रवार, १३ मे १६५९. श्रीशिवनर पति हर्ष निदान साम राज मतिमत | प्रधान. १ ३ अभ्यास :-किल्ला ताब्यात आल्यावर शिवाजी कोणती दक्षता घेत असे?
- लोक, १ ओस, विचार २ ताबा, ३ मशारनिल्हे, ४ बंदोबस्त, सोपा, पडवी, ६ धोका, ७ तकलुपी, ८ बखळ, ९ तयार, १० विल्हेवार, योग्य, ११ तयार, १२ झाले, १३ शिक्क्यांतील मजकूर.
[ २३