पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/207

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७८ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास ५७-६१ धन्यास ठार मारलेला पाहून, अबदुल सय्यद, बंडा सय्यद, अफझलखानाचा पुतण्या उन्मत्त रहिमखान, अत्यंत मानी आणि थोर घराप्यांतील पहिलवानखान, पिलाजी व शंकराजी मोहिते हे दोघे वीर आणि वायूहून अधिक वेगवान्, बलवान् विध्वंसक व अफझलखानाचे पृष्ठरक्षक असे दुसरेहि चार यवन असे ते यवनसेनेचे नायक अतिशय क्रुद्ध व बेफाम होऊन, शस्त्रे परजीत, जंभासुराचा नाश झाला असतां इंद्रावर जसे असुर लगेच चालून गेले त्याप्रमाणे, शिवाजी राजास ठार करण्याच्या इच्छेने सर्व मिळून त्याच्यावर चालून गेले. ७०-७३ तेव्हां संभाजी कावजी, काताजी, (काटकः) इंगळे, कोंडाजी व येसाजी हे दोघे कंक, कृष्णाजी गायकवाड, सूरजी कांटके, त्याचप्रमाणे जिवा महाला, विसाजी मुरूंबक, संभाजी करवर, इभ्राइम शिद्दी (बर्बर) अशा ह्या शिवराज रक्षक दहा महावीरांनीं गर्जना करून, म्यानांतून प्रचंड तरवारी उपसून, पर्वतांनी जसे वायूस आडवावे तसा त्यांनीं (खानाकडील योद्धयांस) तेथे विरोध केला. ७५-७८ हे राजा, तुझ्यावर हा तरवारीचा वार करतो. तो माझा वार संभाळ." असे वारंवार म्हणत त्या वेळी बंडा सय्यद सिंहाप्रमाणे प्रचण्ड गर्जना करणा-या व अफजलखानास ठार मारणाच्या शिवाजीवर पुनः धावून गेला. वेगवान् जिवा महालाने, नको म्हटलें असतांहि “ ह्याला मीच ठार करतो, हा माझ्याजवळ येऊ दे' असे महाराजांचे म्हणणे न ऐकलेसे करून सय्यदानें उगारलेली ती तरवार आपल्या अंगावर घेतली आणि त्या वीरान आपल्या तरवारीने सय्यदाचे दोन तुकडे केले. | एकाशत्यिधिकैः पंचदशाभः समितैः शतैः शालिवाहे शके संवत्सरे चैव विकारणी ।।८३ | मासिमार्गे सिते पक्ष सप्तम्यां गुरुवासरे मध्यान्हे दैवतद्वेषी शिवेनाफजलो हतः ।।८४ (८३-८४ शके १५८१ विकारी नाम संवत्सरी, मार्गशीर्षभासीं, शुक्लपक्षी सप्तमी तिथीस गुरुवारी मध्यान्हीं देवद्वेष्टा अफजलखान शिवाजीने ठार मारला.) अभ्यास :--१शिवाजीनें अफजल खानास वाघनखांनीं मारिलें असी बखरींतील प्रवाद आपणास परिचित आहे पण येथे तपशील निराळा आहे: २ वरील उता-यांवरून कळणारी शिवाजीच्या विश्वासू साहाय्यकांची नांवे सांगा. ३ अफझलखान-शिवाजीचे संभाषण कल्पनेने तयार करा. २२]