पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवाजी-खानाची झटापट १७७ विश्वास आपल्यावर बसवून घेण्यासाठी, आपल्या हातांत असलेली अकुंठित तरवार त्या क्रुद्ध,कपटी खलाने जवळ असलेल्या आपल्या सेवकाच्या हातांत दिली. । २७ मग खोटा स्नेह दाखवून प्रतिकूल दैवाने पछाडलेला तो खान त्यास मोठ्या स्वराने म्हणाला, ३० म्हणून आज मी तुज उद्धटाला शिक्षा लावण्यासाठी आलो आहे. हे गड दे, लोभीपणा सोड आणि मला शरण ये. ३३ अरे शहाजीराजांच्या पुत्रा, पोरा, आपली शहाणपणाची घमेंड सोडून (आपला) हात माझ्या हातांत दे, ये आलिंगन दे. ३४ असे बोलून त्याने त्याची मान डाव्या हाताने धरून दुस-या- उजव्या हाताने त्याच्या कुशीत कट्यार खुपसली. ३५-३६ बाहयुद्धनिपुण शिवाजीने लगेच त्याच्या हातांतून मान सोडवून घेऊन अत्यंत गंभीर ध्वनीने दरी दुमदुमवून टाकली आणि गोंधळन न जातां आपलें अंग किंचित् आकुंचित करून शिवाजीने आपल्या पोटांत घुसणारी ती कट्यार स्वतः चुकविली. ३७-३९ “हा वार तुला करतों तो घे, मला धर' असे म्हणतच, सिंहा. सारखा स्वर, सिंहासारखी गति, सिंहासारखे शरीर, सिंहासारखी दष्टि, सिंहा. सारखी मान असलेला व आपल्या दोन्ही हातांनी फिरविलेल्या नागव्या तर वारीने शोभणारा तो धैर्यवान् वे कर्तृत्ववान् (करारी) शिवाजी, त्या वैयाचा सूड घेण्यास प्रवृत्त होऊन त्याने आपल्या तरवारीचे टोंक त्याच्या पोटांतच खुपसले. ४० त्याने शत्रूच्या पोटांत पाठीपर्यंत झटकन् खुपसलेली ती तरवार सर्व आंतडी ओढून बाहेर पडली. ४३-४६ नंतर आपल्या रक्ताच्या धारांनीं भूमि भिजवून झिगलेल्या माणसाप्रमाणे मूच्र्छने झोकांच्या खात खात अतिविव्हल होत्साता तो खान शिवाजीच्या शस्त्राच्या योगाने पोटांतून बाहेर पडलेली आंतडी जशीच्या तशीच सर्व आपल्या हाताने धरून “ह्याने मला येथे ठार केलें, या शत्रूस वेगाने ठार करा." असें जों आपल्या पाश्र्ववर्ती सेवकास म्हणतो तोंच तो अभिमानी सेवक तीच अफजलखानाची तरवार उगारून ठार मारण्याच्या इच्छेने एकदम शिवाजीवर चालून गेला. ५६ त्याच्या त्या सैनिकांच्या डोळ्यांचे पाते लवते न लवते तोंच या शिवाजी राजाने त्या यवनास धाडकन् खाली पाडलें. : [ २१