पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/205

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७६ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास ११ । । । शिवाजी-खानाची झटापट [ 'शिवभारत' या ग्रंथाच्या अध्याय २१ मध्ये अफझलखान-शिवाजी भेटीचे वृत्त आहे, ते पुढे दिले आहे. परिच्छेदाच्या आरंभींचे आकडे । श्लोकांचे आहेत. ग्रंथ परिचय क्रमांक ७ मध्ये दिला आहे. ] कवीन्द्र म्हणाला १-२ नंतर एकमेकांच्या भेटीकरितां उद्युक्त, त्या गोष्टीचा ध्यास लागलेल्या तत्पर व आपआपल्या राजनीतीने वागणाच्या त्या दोघांचा दूतांच्या (वकिलांच्या) द्वारें जसा करार झाला तसा सर्व सांगतों, हे पण्डितांनो ? ऐका. ३-८ आपलें सैन्य जसे आहे तसे ठेवून एकट्या अफजलखानाने स्वतः सशस्त्र निघावे आणि पालखीत बसून पुढे जावे; त्याच्या सेवेसाठी दोन तीनच सेवक असावेत; तसेच त्याने प्रतापगडाच्या पायथ्याजवळ स्वतः येऊन तेथेच सभा मंडपांत वाट पहात रहावे. आणि शिवाजीने सशस्त्र येऊन त्या पाहुण्याचा आदरसत्कार गौरवानें यथाविधि करावा. दोघांच्याहि रक्षणासाठी सज्ज, स्वामिनिष्ठ, शूर व निष्ठावान् अशा दहा दहा सैनिकांनीं बाणाच्या टप्प्यावर येऊन मागे उभे राहावे; आणि दोघांनींहि भेटल्यावर सर्वच लोकांना अत्यानंदकर असें गुप्त बोलणे (खलबत) तेथे करावे. ११-१८ उपाध्यायाने सांगितल्याप्रमाणे विविध प्रकारांनी देवाधिदेव शंकराची नित्याप्रमाणे पूजा करून, नित्याचा दानविधि उरकला, थोडस जेवले. स्वतः शुद्ध परिमित जल वारंवार आचमनाप्रमाणे पिऊन त्या तुळजा देवीचे क्षणभर मनांत चिंतन केले, तत्कालोचित असा आपला वेष केला, जगांत अप्रतिम असे आपले मुख आरशांत पाहिलें, लगेच आसनावरून उठून आणि पुरोहितास व दुस-या ब्राह्मणांस नमस्कार करून त्या सर्वांचा शुभाशीर्वाद घेतला. दहीं, दूर्वा आणि अक्षता यांस स्पर्श केला, सूर्यबिंब पाहिले, पुढे उभ्या असलेल्या सवत्स गाईजवळ येऊन लगेच ती सुवर्णासह गुणवान् ब्राह्मणास दिली, आपल्या मागोमाग येण्यासाठी सज्ज असलेल्या पराक्रमी अनुयायांस प्रतापगडाच्या रक्षणार्थ नेमले आणि मनांत कपट ठेवून समीप येऊन राहिलेल्या त्या यवनाकडे तो महाबुद्धिमान् शिवाजी आपल्या पाहुण्याला ज्याप्रमाण सामोरे जावे त्याप्रमाणे स्नेहभावाने गेला.

  • २५-२६ क्रुद्ध यमाप्रमाणे समोर उभा असलेल्या त्या दक्ष वीर शिवाजीचा

२०]