Jump to content

पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवाजीचा फडशा पाडण्याबद्दल अफजलखानास हुकूम १७५ व स्तव करण्यास पात्र व संभावितपणाची स्थिति आहे ज्याची व संपत्तीचे केवळ चिन्हच व पुत्रवत अधिकाराचे व या काळांतील सर्व शिपायी मंडळीचे सरदार व श्रेष्ठत्वाचे आकाशातील अतितेजस्वी नक्षत्र व सर्व विद्वानांचे विद्वान व मुलकी व कालीकामाचा बंदोबस्त ठेवणार व कल्याण इच्छक मंडळीतील प्रमुख व मुलुख घेणार व राज्य हस्तगत करणार असे जे अफजलखान महमदषाही यांस कृपाळू होऊन तिकडील सुभेदारी देऊन महाप्रळय कारक फौजेसहित नेमून पाठविले आहेत तरी खान माा निलेचे रजामंदींत व ताबेदारीत तुम्ही राहून शेवकपणाचे अधिकार सिद्धीस नेऊन शिवाजीचा पराभव करून निर्मळ फडशा करावा, आणि शिवाजीचे निसबतीचे लोक ज्या ज्या ठिकाणी राहिले असतील व जेथजेथून येतील त्या लोकास आश्रय न देतां त्यांस ठार मारून या सरकारचे दौलतीचे कल्याण इच्छिणे व उत्तम सेवा करून दाखविणेची चाल प्रसिद्ध करून दाखवावी. कारण कीं खान मशारनिलेचे लिहिण्यावरून दौलतीचे कल्याण इच्छिणेची चाल तुमची या सरकारांत मंजूर होऊन तुमची योग्यता वाढविली जाईल व तुमचे कल्याण करण्यांत येईल व खान म।। निले हे इकडील दौलतीचे कल्याण इच्छिण्याविषयी व पादशाही मसलती प्रकर्णी तुम्हांस जे कांहीं सांगतील व लिहितील ते तुम्ही कबूल करून त्याच प्रमाणे वर्तणूक करीत जावी व खान म। निलेचे सांगण्या व लिहिण्याप्रमाणे जो कोणी वर्तणक न करील त्याने पुरते जाणावे की त्यास कदापि उत्तम फल होणार नाहीं. हे जाणोन ह्या सरकारी आज्ञे। चालावे तेरीख ५ माहे सवाल सन १०५९ (१६।६।१६५९) अतिश्रष्ठ व कल्याणकारक अतिपवित्र सूर्यवत प्रसिद्ध सरकारची हुजुरची परवानगी जाली असे. अभ्यास :-जुन्या पत्रव्यवहारांत आढळणारी अघळपघळ विशेष. णांची खैरात या पत्रांत दिसून येईल. टीप :-फरमानाचे हे भाषांतर पूर्वकाळचे तसेच दिले आहे. असे गो. स. सरदेसाई यांनी शिवाजी सोव्हेनीर मध्ये म्हटले आहे. १मशारनिल्हे-वर सांगितलेला. २ रजा-हुकूम. रजामंदी-खुषी संमति ३ तर्फेचे { १९