पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७४ १७४ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास १०।। शिवाजीचा फडशा पाडण्याबद्दल अफजलखानास हुकूम [ इ. स. १९२७ सालीं शिवाजीच्या जुन्या जन्म तिथीप्रमाणे मुंबईस त्रिशत् सांवत्सरिक उत्सव झाला, त्या वेळीं 'शिवाजी सोव्हेनीर' हा इंग्रजीमराठी-गुजराथी ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्यांतील मराठी भाग पृ.१२०-१२१ वर हे फरमान (राजपत्र) दिले आहे. पत्रांतील मजकुरावरून खानाचा शिवाजीकडे येण्याचा उद्देश स्पष्ट होतो. । हे पत्र कै. स. ग. जोशी यांनी मिळविलें. जोशी यांच्यासारख्या संशोधकांनी मावळच्या देशमुख देशपांड्यांकडून अशासारखे कागदपत्र मिळविण्यांत इतिहाससंशोधक राजवाडे यांची परंपरा पुढे चालविली. यामुळे मराठ्यांचा इतिहास अस्सल साधनांच्या द्वारें प्रकट होण्यास केवढी तरी मदत झाली आहे.] । | हे आलि पैगंबरान् साह्य कर. सुलतान महंमद पादषाह नंतर ईश्वराचे कृपेकडून आलि आदिलषाह पादशाह याणी चंद्र सूर्यावर पादषाही शिक्का ठोकिला. म्हणजे चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत हा हुकूम सर्वांनी मान्य करावा. यदर्थी हा शिक्का ठोकिला आहे. कान्होजी जेधे यांस हा फर्मान सादर केला जातो जे. सु।।,तिसा खमसैन* व अलफ. शिवाजी महाराज याणी अविचार व अज्ञानपणाने निजामशाहीच कोकणातील रहाणारे मुसलमान लोकांस उपद्रव देण्याचा हात लांबवून लुटालुट करून पातषाही मुल्कातील कितेक किल्ले आपले हस्तगत केले आहेत. यास्तव शिवाजीचा पराभव करण्या प्रीत्यर्थ महासामर्थ्य व पराक्रमाचार व प्रकृतीचे मान वोळखणार व कार्यभार जाणणार व श्रेष्ठ वजीर मंडळींतील अति उत्तम व संभावित मानकरी मंडळींतील मुख्य व शूरत्व व पराक्रम समुद्रांतील केवळ सुसरच व बुद्धिमानपणा व यशाचे खाणीतील मुक्ताफळ व शूरत्वाचे रणभूमीतील अश्वारूढ व पराक्रम भूमीतील महाशुर व अत्यंत कृपा करण्यास व योग्यता वाढविण्यास योग्य व सहस्रावधी प्रकारच्या कृपा १ सुङ्गुरसन १०५९ (तिसा =९ खमसैन = ५० अलफ = १०००) १८