१६८
हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास
(८-९) पुढे शहाजीस जिंकण्याच्या हेतूने शहाजहानने आदिलशाहाबरोबर लागलीच तह केला आणि त्या राजेंद्र शहाजीस जिंकू इच्छिणा-या त्या दोघांनीं भीमा नदी ही परस्परांच्या मुलखामधील हद्द ठरविली.
| (१२) सूर्याप्रमाणे प्रतापी शहाजीने शहाजहान आणि आदिलशाह यांच्या सैन्याबरोबर तीन वर्षे युद्ध केलें.
(१३-१८) .... त्याला स्वप्नांत शंकराने सांगितले हा महातेजस्वी दिल्लीपति पृथ्वीवर अजिंक्य आहे, म्हणून हे शहाण्या राजा, तू हा लढाईचा नाद सोडून दे.....याचा संहार करण्यासाठीं जो पृथ्वीवर अवतरला आहे तो भगवान् विष्णु, शिव नांवाचा तुझा मुलगा झाला आहे....म्हणून हे महाबाहो तू कांहीं काळ वाट पहा.
(२१) शहाजी हा हट्टी स्वभावाचा असतांहि त्यानें, आपला हट्ट सोडून शंकराच्या आज्ञेप्रमाणे दिल्लीचा बादशाह आणि आदिलशाह यांच्याशीं तह केला.
(२२-२५) निजामशाहाचे राज्य मिळाल्याने परमुलखावर हल्ला करणारे ते मोगल परत फिरले असतां, शहाण्या आदिलशाहास आपण दुर्बल आहो असे वाटू लागले आणि त्याने आपल्या मनात विचार केला की, ज्या सामर्थ्यवान् मोगलांनी निजामशाहास युद्धांत बुडविले ते मलाहि बुडवतील, म्हणून या महाबाहू शहाजीस आपल्या मदतीस घेऊन मी आपलें इष्ट कार्य साधीन. । 22 (२९) असा मनांत विचार करून त्या महातेजस्वी महमूदशाहाने
शहाजीकडे आपले अमात्य पाठविले.
! (३०) त्या मंत्रकुशल सेनानींनीं शहाजीचे मन वळविले आणि त्याने आदिलशाहास साह्य करण्याचे वचन दिले.
(३१) .... शहाजी राजाचा आधार मिळाल्यामुळे महमूदशाहास पदोपदीं मोठा आनंद होऊ लागला. १०।
"... ਨੀ ਨਈਓ ਨ ਜਿਨ ਸਤਿ ॥ ਨ
2. 15
१२]
पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/197
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
