मोगलाशी टक्कर देणारा शहाजी १६७ प्रस्तुतचा ग्रंथ त्रुटित स्वरूपांत म्हणजे अध्याय ३२ पर्यंतचाच सांपडलेला आहे. त्यांत मालोजीपासून तो शके १५८३ मध्ये सूर्यराजाचे शृंगारपुर हस्तगत करून तेथे त्र्यंबक भास्करास अधिकारी नेमलें' येथपर्यंतच वर्णन आहे. या ग्रंथाचा पुढील . भाग आतां उपलब्ध झाल्याचे कळते. शिवभारत ग्रंथारंभीं, “तीर्थयात्रेच्या निमित्ताने काशी येथे कवीन्द्र गेला असतां, त्याने तेथील पंडितांना भागीरथी नदीचे कांठीं वसून हें। पुराण सांगितलें अशी भूमिका घेतली आहे......' यामुळे कवीन्द्र हा वक्ता व काशी येथील पंडित हे श्रोते अशी मांडणी केलेली असून पंडितांनी प्रश्न विचारावे व परमानंदाने उत्तरे देऊन माहिती सांगावी अशी हरएक प्रसंगांची पद्धत आहे. शंकराच्या दृष्टांताचे निमित्त युद्ध थांबविण्यासाठी भारतकाराने दिले, ते पटणारे नसले तरी ' मोगल आटपत नाहींत' म्हणून तह झाला ही गोष्ट मात्र खरी दिसते. तसेच तत्कालीनास शहाजीच्या पराक्रमाची जाणीव होती हेंहि यावरून स्पष्ट होईल. कारण तह केल्यावरहि आदिलशाहाने मोठ्या इतमामाने त्यास आपल्या नोकरींत घेतले. | एकट्याच्या बळावर बलाढ्य मोगलांशीं तीन वर्षे टक्कर देणारा शहाजी स्वराज्यसंस्थापकाचा पिता शोभतो यात शंका नाहीं. तत्का-- लीन मराठ्यांचे सामर्थ्य कसे आक्रमक होऊ लागले होते हैं। त्याच्या रूपाने समजून येते. ] (१-२) पुढे देवगिरी प्राप्त झाल्याने दिल्लीच्या बादशाहास आनंद झाला असतां व उन्मत्त महमूदशाहास आपलें सैन्य पराभूत झाल्याने विषाद वाटला असतां शहाजी राजाने निजामशाहाचे शिवनेरी इत्यादि अनेक गड भराभर घेतले. | (३-४) तसेच अत्यंत पवित्र गोदावरी, प्रवरा, क्षीरसमुद्रासारखें पाणी असलेली नीरा, भयंकर भीमा, यांच्या कांठचा सर्व प्रदेश क्रमाक्रमानें पादाक्रांत करून त्याने सह्याद्रीसुद्धां लगेच आपल्या ताब्यांत आणला. | (५-७) शहाजी दिल्लीच्या बादशाहाविरुद्ध झालेला पाहून घाटगे कांटे, गायकवाड, कंक, ढोमरे, चव्हाण, मोहिते, महाडिक, खराटे, पांढ, वाघ, घोरपडे इत्यादि महाराष्ट्रीय (मराठे) राजे त्यांस येऊन मिळाले आणि शहाजीने त्यांस सेनापती केले.
पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/196
Appearance