पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/195

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास ७ । । । मोगलाशी टक्कर देणारा शहाजी [ अहमदनगरची निजामशाही व विजापूरची आदिलशाही, येथील राजकारणाची सूत्रे खेळविणारा शूर व वजनदार मुत्सद्दी. म्हणून शहाजी दक्षिणेत सतराव्या शतकांत ओळखला जात असे. निजामशाहीची पुनः उभारणी करण्यासाठी त्याने फार खटपट केली. ती शिवभारतांतील अध्याय ९ मध्ये श्लोक १ ते ३५ पर्यंत वणली आहे. त्यांतील मुख्य भाग पुढे दिला आहे. पहाः-शिवभारत, (संपादक-. स. म. दिवेकर) पृ. ७८.केसांतील आकडे श्लोकांचे आहेत. || शिवभारत कसे सांपडलें ? ‘शिवभारत' हा शिवकालीन ग्रंथ प्रकाशांत आल्याचा इतिहास उद्बोधक आहे. प्रस्तुतची उपलब्ध प्रत कै. स. म. दिवेकर यांनी संपादिलेली आहे. त्यास कै. द. वि. आपटे यांनी या ग्रंथांतील गोष्टी इतर पुराव्यांनी कशा सिद्ध होतात' हे दर्शविणारी विद्वत्ताप्रचुर प्रस्तावना लिहिली आहे (इ. स. १९२७). | तंजावर येथील 'सरस्वती महाल पॅलेस लायब्ररी' मध्ये अनेक हस्तलिखित ग्रंथ आहेत, त्यांत रामदास-शिवाजीसंबंधीं कांहीं साधने मिळाल्यास पहावी या हेतूनें कै. दिवेकर तेथे गेले. ते लिहितात “तामील, तेलुगू, कानडी, संस्कृत, मराठी आदि भाषांत हे लिखाण आहे. तेथे या साधनांची अव्यवस्थाच होती, पण चिकाटीनें ग्रंथ चाळीत असतां तामील भाषेत शिवभारत या नांवाचा ग्रंथ अदमासे दोन अडीच बोटे रुंदीच्या व सुमारे दोन विती लांबीच्या ताडपत्रावर दोन्ही बाजूंनी लिहिलेला उपलब्ध झाला. त्याच्या कांहीं भागांचे भाषांतर तेथील व्यवस्थापकांकडून ऐकावयास मिळालें'; पुढे त्यांनी या ग्रंथाची नक्कल मिळविली व यत्न करून त्याचे इंग्रजी भाषांतरहि करवून घेतले. ते वाचीत असतां याचे मूळ संस्कृतांत असावे असे वाटून शोध सुरू केला. तंजावर ग्रंथालयाचे नकारार्थी उत्तर आले; तेव्हां यूरोपमध्ये पौर्वात्य ग्रंथसंग्रह। ठिकठिकाणी आहेत तेथे चौकशी सुरू केली, तेव्हां जर्मन ओरिएन्टल सोसायटी, लायपझिग, या संस्थेच्या कॅटलॉगांत 'शिवभारताचा' उल्लेख व तो तंजावरच्या ग्रंथालयांतच आहे असे दर्शविणारा क्रमांक मिळाला. हा क्रमांक तंजावर ग्रंथ संग्रहास कळवितांच तो ग्रंथ तेथे असल्याचे उत्तर आले ! तामीळ ग्रंथाशीं ताडून पाहतां याच ग्रंथाचा तो अनुवाद होय हेहि लक्षांत आले. सुमारे ९ वर्षे हा उद्योग श्री. दिवेकर करीत होते. '१० ]