पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/194

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवपूर्वकालीन दुःस्थिति १६५ लोकें स्थानभ्रष्ट जालीं । कितेक तेथेंचि मेलीं । उरलीं तें मराया आर्मी । गांवावरी ॥२॥ माणसा खावया धान्य नाहीं । आंथरुण पांघरुण तेहि नाहीं । घर कराया सामग्री नाहीं। काये करिती ॥३॥ पुढे आला प्रजन्य काळ । धान्य महर्ग दुःकाळ । शाकार नाही भळभळ । रिचवे' पाणी ॥४॥ कितेक अनाचार पडिलीं । कितेक यातिभ्रष्ट' जालीं। कितेक ते आक्रंदल । मुलेबाळे ॥५॥ कितेक विवें घेतलीं । कितेक जळीं बुडालीं। जाळिलीं ना पुरिलीं । किती येक ॥६॥ ऐसें जालें वर्तमान । पुढे हि अवघा अनमान। सदा दुश्चीतं अवघे जन । उद्वेगरूपी ॥७॥ कांहींच पाहातां धड नाहीं । विचार सुचेना कांहीं। अखंड चिंतेचा प्रवाहीं । पाडले लोक ॥८॥ येक म्हणती कोठे जावें । येके म्हणती कार्य करावे ।। विदेशा जाउन काये खावे । वेच नाहीं ॥९॥ तथापि मार्गाचे चालेना । भिक्षा मागतां मिळेना ॥ अवघे भिकारी च जना । काय म्हणावें ॥१०॥ प्राणीमात्र जाले दुखी । पाहातां कोण्ही नाहीं सुखी। कठिण काळे वोळखी । धरीनात कोण्ही ।। ११ ॥ -रामदास | १ सांडणे, ओतणे. २ धर्माविरुद्ध आचरण ३. जातिभ्रष्ट. ४ संशय. ५ मन स्वस्थ नाहीं. ६ खर्च करण्यास पैसा. ११ सा.इ. [९।