पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संतांचा मराठीचा अभिमान १५९ संतांचा मराठीचा अभिमान [ वारकरी पंथाचे संस्थापक ज्ञानदेव यांनी आग्रहपूर्वक आपला उपदेश देववाणी संस्कृतमध्ये न करता मराठींत केला. त्या काली लोकभाषेत पांडित्य दाखविणे म्हणजे वेळेचा अपव्यय होय, असा विद्वानांचा खराखोटा समज होता. पण ज्ञानेश्वरांनीं तथाकथित प्रतिष्ठित कल्पनांचा त्याग करून मायभाषेत भगवद्गीतेचा अर्थ सांगितला. हीच परंपरा साधु एकनाथांनी चालविली. धर्मतत्त्वांच्या उपदेशाला मराठी ही अपुरी आहे असे म्हणणारांना ज्ञानेश्वरएकनाथांनी पुढील ठणठणीत उत्तर दिले आहे. | भाषा हा जीवनाचा श्वास आहे. मातृभाषेच्या द्वारा मिळणारे ज्ञान हृदयाला भिडते. शिवकालीन तुकाराम-रामदास आदि साधुसंतांनी स्वधर्माचा व स्वभाषेचा अभिमान जागृत केला, त्याच आधारावर शिवाजीला राष्ट्राभिमान जागृत करता आला. या साधूंनी आपल्याला रसाळ काव्याने व कथेतील उपदेशाने हजारो लोकांना स्वार्थी संसारी वृत्तीपासून परावृत्त करून उच्च ध्येयाच्या भजनीं लाविलें. राज्यक्रांतीला आवश्यक असणारी मनोवृत्ति उत्पन्न होण्यास व रुजण्यास त्या काली (मुद्रण कलेच्या अभावीं) कथा व प्रवचने हाच मार्ग होता व तो संतांच्या हातांत होता. त्यांचे पाठबळ नसते तर समाज जागृत होणे कठिण होते. ] ज्ञानेश्वर माझा मन्हाटयाचे बोलु कवतिके। | परि अमृतातेही पैजेसी जीके । ऐसी अक्षरेंचि रसिके । मेलवीन् । ज्ञानेश्वरी (राजवाडे प्रत), अध्याय ६, ओवी १४ लेखनकाल, शके बाराशेबारा. [स्थल अर्थ :--मी मराठीच शब्द योजीत आहे परंतु ते असे रसपूर्ण वेचून योजीन कीं ते गोडपणांत प्रत्यक्ष अमृतालाहि सहजासहजी हार स्वावयास लावतील.]