पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५४ हिंदुस्थानचा साधन, इतिहास रांगड्यांची नजर इकडे राहू न द्यावे, मेल पार ठिकाणास घेऊन जाऊन, आपले फडशा करून घ्यावे हीच पाहिली. लोकांसी वायदेही बहुत होऊन गेले. सवड बोलण्याची कांहींच राहिली नाही. तेव्हां अलीबहाद्दरबाबा यांसी इकडील माहितगारी करून दिल्ही आहे. रोहिला शत्रु भारी होता. त्याचेहि पारपत्य जाहलें. जिवंत धरून आणिला. खूळ मोडले. याउपरी अलीबहाद्दरबाबा इकडील बंदोबस्त राखतील. सरकारांतून आपण अलीबहाद्दर यांची पुरवणी" पैक्याने व फोजेने करावी. इकडील मुलूक निर्वेध जालाच आहे. एक वर्षाने पुढे इकडे फौजा राहतात त्याचे खर्चाचा सुभत्ता" इकडे पडेल. सारांश आम्ही लोकांपुढे आपले स्वाधीन असे नाही ? गेलेली मसलत' श्रीमंतांचे प्रतापे सुधारली आहे. साता-याप्रमाणे दिल्लीचे संस्थान जालें आहे. बंदोबस्ताची पैरवी करणे आपल्याकडे आहे. येविसीं वरचेवर पत्रे पाठविली. आहेत, ती पावोन तद जाहलीच असेल. रा। छ ९ रबिलाखर बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंती. अभ्यास :--या उता-यांच्या अधाराने आणि इतर माहिती मिळवून पुढील प्रश्नांची चर्चा करा. औरंगजेबानंतर मोगल पादशाहीचा अधःपात फार लवकर कां झाला ? याची पुढील मुद्दे लक्षात घेऊन चर्चा करा :- (१) स्वतः बादशाहांची वागणूक (२) नादीरशाहाच्या स्वारीचा धक्का. (३) मराठ्यांचा पराक्रम (४) निजाम-उल्-मुल्कसारख्या सरदाराच्या आणि इतर सरदारांच्या वृत्तींतील फरक. (५) सय्यद बंधूचा कारभार. २ गुजराथ व मेवाड यांमधील देशास रांगडा म्हणतात. तेथील राहाणारा, सामान्यतः राजपूत. ३ चंबळा. ४ नाश. चंवळेपर्यंतची ठिकाणे घेऊन | आम्हांला इकडे राहू देऊ नये. आमचा नाश करावा, असा अर्थ. ५ साहय. ६ सुरक्षित. ७ सुबत्ता, पुरवठा. ८ आपले–लोकांचे स्वाधीन, आम्ही परस्वाधीन ना हीं असा अर्थ. ९ बिघडलेले कारस्थान. ।। ७० ] ७० ] बिघडलेले कारस्य स्वाधीन, आम्ही पर असा अर्थ, ८ आप करावा, अची ठिकाणे घे