पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दिल्लीचे संस्थान जालें आहे १५३ मी पूर्वी लिहिले आहे कीं, बादशाहाचा शिरच्छेद झाला; पण तेथून नंतर आलेल्या बातमत तो प्रसंग नाहीं. बाकी सर्व वार्तेला मात्र दुजोरा आहे. आतां असे सांगितले जात आहे की, त्यास फक्त पकडण्यात आले होते. असेहि म्हणण्यांत येते कीं निजामाचे आणि नादीरशाहाचे कांहीं संधान होते. एक महिन्याने अशी बातमी आली की, महंमदशाहाला पुन्हां सिंहासनावर बसविले. त्याच्या कन्येचा आणि तहामस्प कुलिखानाच्या पुत्राचा विवाह करण्यांत आला, बादशाहाच्या खजिन्यांतील प्रत्येक वस्तू घेतल्यानंतर कुलीखान अटकेपार झाला. मुलतान आणि काबूलवर त्याने हल्ला केला आणि वो आतां आपल्या राज्याच्या मार्गावर आहे. | खूप लोकांचा खून करण्यांत आला व कित्येक स्त्रियांनी आत्महत्या केली. असा अंदाज आहे की, या रीतीने १ ते १।। लक्ष स्त्री-पुरुषांचा संहार झाला. ४७ । । । । दिल्लीचे संस्थान जालें आहे [‘महादजी शिंदे यांची कागदपत्रे' मधून क्रमांक ५५५ चे पत्र पुढे दिले आहे. उत्तरेकडील रोहिले वगैरे शत्रूचा नाश केल्यावर महादजी, नाना फडणविसास, उत्तरेची जबाबदारी घेण्यास अलिबाहादरास नेमावे व दक्षिणेतून त्यास साह्य करावे असे सुचवीत आहे. महाराष्ट्राच्या पत्ररूप इतिहासांत पृ. २५४ वर हे पत्र छापलें आहे ते तसेच सटीप पुढे दिले आहे. पत्राची तारीख ६ जानेवारी १७८९.? श्री राजश्री बालाजीपंत नाना गोसावी यासीं :-- छ दंडवत विनंती उपरी. येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत असले पाहिजे विशेष :--सांप्रत आपणांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं, तरी सविस्तर इकडून वरचेवरी पत्रे रवाना जाहली आहेत त्यांची उत्तरें यावीं. इकडील बंदोबस्ताचीं पैरवी होळकर व अलीबहाद्दर यांसी पत्रे येऊन व्हावी. त्या उत्तराची प्रतीक्षा आजपर्यंत जाहली. सांप्रत १ व्यवस्था. [६९