पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/182

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५२ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास खान याने - - - - - टर्कीच्या सुलतानाचाहि पराभव केला. नंतर त्याने आपले लक्ष दिल्लीकडे वळविले. मोगल बादशाहास त्याने मगरूरीचा संदेश पाठविला -- - - - तहमास्प कुलीखानाने इ. स. १७३८ त ६० सहस्र घोडेस्वारांसह (आपली राजधानी) इस्पहान सोडले. वाटेवर अनेक (टोळीवाल्यांच्या) पुढा-यांना त्याने नमविले. त्यांच्याकडून खंडणी वसूल केली आणि दिल्लीच्या साम्राज्यांतील मुख्य शहर जे लाहोर त्यावर हल्ला केला. तेथील किल्ला त्याच्याच हातांत पडला. बादशाहाला क्रोध आला आणि त्याने निजाम आणि इतर उमरावांना त्याच्यावर जाण्याची आज्ञा केली. त्यांनी युद्ध कले पण ते पराभूत झाले. या पराभवाने बादशाह चिडला नि त्याने पुनः युद्ध करण्याचा आदेश दिला. ईश्वरी कृपा असल्याने तहामस्पचा विजय झाला व तो थेट दिल्लीपर्यंत गेला; दिल्ली सर केली. बादशाह मुहम्मदशाह आणि सरदारांना त्यानें कैद केले. एक दिवस त्याने आज्ञा केली कीं, वादशाह आणि त्याचे वीस पंचवीस सरदार यांचा बाजारांत जाहीरपणे वध करावा. त्यानंतर त्याने आपल्या नांवाची नाणी पाडली आणि जुन्या नाण्यांतून मुहंमदशाहाचे नांव काढून टाकण्याची आज्ञा केली. यानुसार सुरतेच्या नबाबाला आज्ञापत्र आलें कीं, मुहम्मदशाहाच्या नांवाची नाणी व्यवहारांतून काढून टाका आणि * ईश्वरकृपेने बादशाह नादीरशाह' असा शिक्का असलेली नाणी सुरू करा. सनदा इत्यादि या बादशाहाच्या नांवें दिल्या पाहिजेत.......सुरतेच्या नबाबांनी या वृत्ताची शहरभर घोषणा केली आणि नवीन नाणी पाडण्याचा हुकूम केला. जुनी नाणी गोलाकार होतीं, नवीन नाणी एका टोंकास अणकुचीदार होती. हा फरकहि नव्या बादशाहाच्या आज्ञेने करण्यांत आला होता असे सांगितले गेले. सुरतेहून ही वार्ता गव्हर्नर, कौन्सिलर आणि मि. एलिस यांना आली. ज्या जहाजाने ही बातमी आणली ते उपयुक्त व्यापारी मालाची वाहतूक करीत होते. जर असा दुर्दैवाचा घाला दिल्लीच्या बादशाहावर खरोखर पडला असेल तर सामान्य मनुष्याच्या दुःस्थितीविषयी बोलावयासच नको. जगांतील राजांची संपत्ति व सत्ता यांचा काय उपयोग ? नष्ट होणा-या या गोष्टी आहेत. दयाळू परमेश्वराचे राज्य हें खरें टिकाऊ राज्य, इतर सर्वांचा विनाश ठरलेलाच. ६८]