पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४६ । हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास नाहीं तर निदान राजा व प्रजा यांची एकमेकांबद्दलची कर्तव्ये काय याचे ज्ञान तरी तू मला द्यावयाचे होतेस कीं नाहीं ! ....बरें झालें कीं, इतर अनेक विषयांवर तुझ्यापेक्षा जास्ती योग्यतेच्या माणसांचा सल्ला मी घेतला ! चलो, अपने देहातको चले जाओ ! तू कोण आहेस आणि तुझे काय झाले हेहि कोणास न कळलेले चांगलें ! 1 --- - ४१ । । । * मी एकटा चाललो !' | [अंतःकाळचे पत्र. इ.स. १७०७ मध्ये आपला मुलगा कामबक्ष यास । औरंगजेबाने पाठविलेल्या पत्रांपैकी एक पत्र पुढे दिले आहे. लेटर्स ऑफ औरंगजेब पृ. ७३ वरून.] माझ्या लाडक्या मुला, || माझ्या ऐन उमेदीच्या व भरभराटीच्या काळांत मी तुला उपदेश केला व तुझ्यासाठी कष्टहि केले ; पण त्या वेळीं ईश्वराची इच्छा नसल्याने त्याकडे तू लक्ष दिले नाहींस. आता मी सर्व सोडून जाणार.... माझ्या धडपडीबद्दल आतां मला वाईट वाटते. कारण त्या धडपडीचा मला आज काय फायदा ? माझ्या पापांचों व अदूरदर्शी कृत्यांची फळे मात्र माझ्याबरोबर येणार आहेत ! ईश्वरी लीला अतयं आहे. मी एकटा येथे आलो आणि एकटाच निघून जात आहे ! या जगांत प्रवास करीत करीत पुढे जाणाच्या मानवी टोळीच्या पुढायाने मला एकटेच मागे ठेवल्यासारखे वाटत आहे. • • - ---- छावणीची आणि सैनिकांची चिता मी काय करू ! माझेच काय होत आहे मला कळत नाहीं ! - - - - - - अशक्तपणामुळे पाठीस पोंक निघून मी वांकून गेलो आहे आणि पायांत तर दोन पावले टाकण्याचेहि त्राण नाहीं. मीं जीं असंख्य दुष्कृत्ये केली त्यांबद्दल मला किती दंड, भोगावा लागेल कोण जाणे ! ----- प्रजापालन करणे ही परमेश्वराने माझ्या मुलांना दिलेली एक विश्वासाची ठेव आहे. तरी सद्धर्मीयांवर संकटे येणार नाहींत अशी त्यांनी काळजी घ्यावी, नाही तर त्यांचे शाप मला भोंवतील ! मुला, तुझे, तुझ्या आईचे व मुलांचे ईश्वर रक्षण करो ! अंतःकाळच्या वेदना आपला अंमल मजवर त्वरेने बसवीत आहेत ----- ६२]