पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/173

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४३ दुर्गादासाने औरंगजेबास चकविलें ३९ :: दुर्गादासाने औरंगजेबास चकविलें [प्रस्तुतचा उतारा खाफीखानकृत 'मुन्तखब-उल्-लुबाब' या ग्रंथांतून घेतला आहे. या ग्रंथास तरीख-इ-खाफीखान असेहि म्हणतात. खाफीखानाने इ. स. १५१९ म्हणजे बाबरपासून ते महंमदशाहाच्या कारकीर्दीच्या १४ व्या वर्षांपर्यंत म्हणजे इ. स. १७३४ पर्यंतचा इतिहास लिहिला आहे. औरंगजेबाच्या कारकीर्दीसाठीं खाफीखानाच्या ग्रंथाइतकें विश्वसनीय साधन उपलब्ध नाहीं. विशेषतः औरंगजेबाने तवारीख लेखन बंद केल्याने त्याच्या कारकीर्दीची हकीकत मिळणे दुरापास्त होते. पण खाफीखानाने तेवढ्याचसाठीं बादशाहास न कळेल अशा रीतीने गुप्त रीतीने इतिहासलेखन चालू ठेवले. खाफीखानाचे मूळ नांव मुहम्मद हशीम किंवा हशीम अलीखान आहे. खाफी म्हणजे गुप्त. याने गुप्तता राखून इतिहास लिहिला म्हणून संतोष पावून महंमदशाहाने त्यास खाफीखान म्हटले व त्याच नांवानें तो पुढे प्रसिद्ध झाला असे म्हणतात पण हे खरे दिसत नाहीं. तो मूळचा खुरासान जिल्ह्यांतील ख्वाफ गांवचा म्हणून ख्वाफीखान किंवा खाफीखान. तो आपल्या बापाचे नांव मीर ख्वाफी असे सांगतो, यावरून संशय रहात नाहीं. खाफी म्हणजे गुप्त या अर्थावरून महंमदशाहाने त्याच्या नांवावर वर दिलेली कोटी केली असेल हे मात्र शक्य आहे. निजामउल्मुल्काचा खाफीखानावर मोठा विश्वास असे. या काळांतील मराठ्यांच्या इतिहासास जीं पशियन साधने उपलब्ध आहेत त्यांत खाफीखानाच्या इतिहासास फार मोठे स्थान आहे. इ. स. १६०५ सालापासूनच्या सुमारे १३० वर्षांचा इतिहास त्यानें। विशेष सविस्तर सांगितला आहे. त्यापैकीं अखरच्या ५३ वर्षांचा काळ तर खुद्द त्याच्या नजरेखालचा असा आहे. इ. व डौ. व्हॉ. ७, पृ. २०७ पाहा. उतारा. पृ. २९७ पाहा.] कथासंदर्भ :--जोधपूरचा राजा जसवंतसिंग यास अफगाणिस्थानाकडे स्वारीस पाठविले होते. त्याला तिकडे मृत्यु आला (१०।। डिसें. १६७८). हे कळताच जोधपूरचे राज्य घेण्याचा घाट औरंगजेबाने घातला. त्याचे वारस नाहींसे करून त्याने मुसलमान अधिकारी। जोधपुरांत पाठविले. सरहद्दीवरून राजपूत सैन्य परत येत असतां जसवंतसिंगाच्या दोन विधवा राण्यांना मुलगे झाले. एक मुलगा दोन आठवड्यांतच वारला, परंतु दुसरा अजितसिंग पुढे जोधपूरचा राजा [ ५९