पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४० अचाने मोगल दर ३. स. १७१७ हे अस येथे राहूं। हिंदुस्थानचा साघनरूप इतिहास सुरतेला येऊन पोहोंचला; तेथून ब-हाणपूराहून दिल्लीस गेला. त्याने कांहों काळ औरंगजेबाचे पदरी नोकरी धरली; पण त्याचा ओढा दाराकडे होता. दाराची वाताहात झाल्यावर बंगाल्यांत डोक्क्यापर्यंत प्रवास करून तो परत दिल्लीस आला. तेथे जयसिंगाचे पदरीं त्याने नोकरी धरली; त्याचेबरोबर तो दक्षिणेस आला. प्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यांत जयसिंगाबरोबर तो होता. तेथून तो जयसिंगाची नोकरी सोडून गोव्यास राहिला व तेथून पुनः १६६८ चे सुमारास दिल्लीस गेला. यानंतरहि त्याच्या आयुष्यांत अनेक स्थित्यंतरे झाली. इ. स. १६८१ चे सुमारास फिरून तो.गोव्यास आला व इ. स. १६८३ सालीं संभाजीने गोव्यावर हल्ला केला असतां मनूची हा गोवेकर पोर्तुगीजांतर्फे संभाजीशीं बोलणे करण्यास आला. इ. स. १६८६ त तो पाँडिचरीस गेला. तेथे त्याने लग्न केले. या वेळी इंग्रजांच्या दोन ईस्ट इंडिया कंपन्यांची चढाओढ चालू होती व त्यांपैकी एकीनें मनूचीस नोकरींत बोलाविले. पण मनूची गेला नाही. येथून पुढे तो पाँडिचरी येथे राहूं लागला. त्याच्या मृत्यूचे साल इ. स. १७१७ हे असावे. मनूचीजें मोगल दरबारची अगदीं सूक्ष्म अशी हकीकत दिली आहे. त्यांतील कित्येक कथा ऐकीव व अविश्वसनीय' वाटतात; पण त्या तत्कालीं प्रचलीत असल्या पाहिजेत. मनूचीने आपल्या कल्पनेतून त्या काढलेल्या नाहीत. मनूचीच्या ग्रंथाचे नांव ‘स्टोरिआ ड मोगॉर' असे आहे. पुढील उतारा खंड १ ला, पृ. २७८]

राजपुत्र दारा व औरंगजेब यांमध्य १६५८ त सामुगडास जी लढाई झाली त्याबद्दल मनूची लिहितो:--
  • या लढाईत आणि मी हजर असलेल्या इतर लढायांतहि मला असे आढळून आलें कीं, आघाडीस जे शिपाई असत तेच फक्त लढाई करीत. मागील फौजेतील शिपाई हातांत नंग्या तलवारी असूनहि केवळ 'मारो, मारो असे ओरडत. आघाडीवरील शिपाई पुढे चढाई करू लागले, तर त्यांच्या मागील रांगा त्यांचे अनुकरण करीत. ते जर परतुं लागले तर मागील रांगा पळ काढीत. ही हिंदुस्थानांतील पद्धति यूरोपांतील पद्धतीच्या अगदी विरुद्ध आहे. हे शिपाई एकदां पळू लागले म्हणजे कसल्याहि उपायाने त्यांना थांबविणे शक्य नसे." - - । । ५८-_।।।।

|| २ || ५६ ]