पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३८ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास ते उदासीन बनतात. ते बंड करीत नाहीत किंवा कोठे पळून जात नाहींत याचे कारण (केवळ) सुसज्ज लष्कराचा धाक. या दुर्दैवी देशाचे दैन्य आणखी एका गोष्टीने वाढले आहे. नेहमीच पण सामान्यतः एखादं युद्ध उद्भवलें कीं वर्षांचे वसूलाचे येणे अगाऊ रोख पैशांत घेऊन प्रांतिक सरकारचे अधिकार विकण्याची (दिल्लीच्या) सरकारची पद्धति; यामुळे अशा प्रांतांतील सुभेदारांचे प्रमुख काम म्हणजे आपण मुख्य सरकारला दिलेले पैसे वसूल करणे हे होऊन बसते, कारण त्याने पूर्वी जी रक्कम जबरदस्त व्याजानें उसनी काढलेली असते ती त्यांस परत करावयाची असते. तसेच अधिकारपद विकत घेतलेले असो किंवा नसो, सुभेदार आणि वसूलाचा मक्तेदार यांना प्रतिवर्षी वजीर, खोजा किंवा दरबारांत विशेष वजन असलेल्यांस नजराणे देण्यासाठी पैसा उभारावा लागतो. बादशाहाला नजराणा देण्यासाठी नियमितपणे वसूली करण्याचे काम अधिका-यांस करावे लागते. या प्रकरणाने हा ( अधिकारी ) मुळांत द्ररिद्री नि गुलाम असला, कर्जबाजारी असला, आणि वडिलाजित कर्पादकहि त्याजवळ नसली तरी तो मोठा श्रीमंत बनतो. अशा रीतीने देश उध्वस्त झालेला आहे. प्रांतिक सुभेदार म्हणजे लहान लहान जुलमी राजेच. त्यांचा अधिकार अमर्याद आहे. त्यांनी केलेल्या जुलुमाविरुद्ध तक्रार करण्यास त्रस्त प्रजेला जागा नाहीं नि त्या तक्रारींची दाद लागण्याची आशा नाहीं. मग त्याच्यावर झालेला अन्याय कितीहि भयंकर असो किंवा वारंवार तोच अन्याय केला जात असो. अभ्यास :--रायबहादूरमल नि बनिअर यांचे हे लेख वांचा नि सांगाःशहाजहानचा काळ म्हणजे 'सुवर्णयुग' म्हणण्याची रीत आहे, पण बनिअरच्या दृष्टीने या युगांतील दोष कोणते ? रायबहादूरमलने कोणते गुण सांगितले आहेत ? साम्राज्याच्या दृष्टीने हे ‘सुवर्णयुग' होते, कों जनतेच्या दृष्टीने ? तुमचे मत सांगा. : . • - .. של שנות ה . הן על פניו, ישימך אליך - । ...... । ५४]