पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/167

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बनिअरने काढलेले चित्र : त्रस्त जनता १३७ ३४ :: :: बर्निअरने काढलेले चित्र : त्रस्त जनता [फ्रेंन्सिस् बनिअर हा फ्रेंच प्रवासी इ.स. १६५८चे सुमारास हिंदुस्थानांत सुरत येथे आला. इ. स. १६५९साली त्याची दाराशीं अहमदाबाद येथे गांठ पडली. दाराने त्याला आपल्याबरोबर वैद्य म्हणून ठेवून घेतले. पण पुढे दाराची दुर्दैवाने वाताहात झाल्यावर बनिअर इ. स. १६६३चे सुमारास दिल्ली येथे गेला व तेथून त्याने काश्मीरचा । प्रवास केला. नंतर टॅव्हनयरच्यासमवेत तो बंगालमध्ये गेला, तेथून : इ. स.१६६६ चे सुमारास तो मच्छलीपट्टण व गोवळकोंडा येथे गेला व इ. स. १६६७ त सुरतला येऊन पोहोचला. इ. स. १६७० त त्याच्या प्रवासवृत्ताचा ग्रंथ फ्रान्समध्ये प्रसिद्ध झाला. तो त्याने फ्रेंच, बादशाहास अर्पण केला आहे. तो २२ सप्टेंबर १६८८ रोजी आपल्या वयाच्या ६८ व्या वर्षी पॅरिस येथे मृत्यु पावला. प्रथम दाराबरोबर व नंतर दिल्ली येथे वैद्य म्हणून राहण्याचा त्याला प्रसंग आल्याने त्याला मोगल दरबारचा व्यवहार बारकाईने पाहातां आला. सूक्ष्म अवलोकन व तपशीलवार वर्णन हे बनिअरच्या लेखनाचे विशेष आहेत. त्याने गादीच्या हक्काचे भावाभावाचे युद्ध बरेच विस्ताराने वणले असून शिवाय काश्मीर, बंगाल येथील माहितीहि सविस्तर दिली आहे. वनअरने लेखनासाठी नुसत्या अवलोकनावरच भिस्त न ठेवतां बरीच माहिती परिश्रमपूर्वक जमा केली. शिवाजीचे जुने चित्र याच्या ग्रंथांत सांपडते. बनिअरच्या ग्रंथांत स्त्री सती जाण्याचा विधि, जगन्नाथाची मिरवणूक, सूर्यग्रहणाच्या दिवशींचे आचार इत्यादि विविध गोष्टींची माहिती मिळते. त्याने आपल्या ग्रंथास एक हिंदु: स्थानचा नकाशाहि जोडलेला आहे. एकंदरीत हिंदुस्थानची जनता ही बादशाह, सरदार व जहागीरदार यांच्या जुलमाने पिळून निघालेली व शिक्षणांत मागासलेली आहे; पण राजधानीचे वैभव मात्र डोळे दिपण्या सारखे आहे, असा बनिअरच्या लेखनाचा सारांश आहे. तो त्यानें । पूर्वग्रहरहित वृत्तीने नमूद केला आहे. उतारा प्र. वृ. पृ. २३०-३१] थाटामाटाचा दरबार चालविण्यासाठी आणि प्रजेला दाबांत ठेवण्यासाठी ठेवलेल्या खड्या सेनेच्या खर्चामुळे प्रदेशांत हलाखी पसरलेली आहे. लोकांच्या हालांचे उचित वर्णन करतांच येणार नाहीं. दुस-याच्या फायद्यासाठीं (सरकारी शिपायांच्या) दंडुक्याच्या धाकांत लोकांना सतत कष्ट करावे लागतात व त्यांना क्रूरतेने वागविले जाते. यामुळे जीविताविषयीं [ ५३