१३०
हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास
कारकीर्दीचे टिपण करण्यास एकाहून अधिक अधिका-यांची नेमणूक केली असली पाहिजे. इलीयट डौसनचा ग्रंथ खंड ६ पृ. २५१ वर या आत्मचरित्राची चिकित्सक छाननी आहे. तसेच जहांगीरच्या आज्ञांचे चिकित्सक परीक्षण करून त्यांतील बढाईखोरपणाहि उघडकीस आणला आहे (कित्ता पृ.४९३पहा). उदाहरणार्थ, पहिल्या आज्ञेत ‘प्रत्येक जहागीरदाराने ..... स्वत:च्या फायद्यासाठीं बसविलेल्या जकातीस बंदी करण्यांत आली,' असे लिहिले आहे. पण यांत जहांगीरने नवे कांहीं केलें नसून त्याच्या बापाच्या वेळचा प्रघात पुढे चालू ठेवला एवढेच. अर्थात् हा प्रघात पुढे चालू ठेवण्याची दक्षता ठेवण्याचे श्रेय तरी जहांगीरला मिळते यांत वाद नाहीं.]
राज्यारोहणानंतर पहिली आज्ञा केली की, न्यायशृंखला बांधा, म्हणजे न्यायखात्यांतील मंडळींनी न्याय देण्यास दिरंगाई केली किंवा ढोंगीपणा केला, तर त्रस्त झालेल्या व्यक्तीस माझे लक्ष वेधण्याकरितां साखळी
ओढता यावी.
सर्व राज्यभर अंमलांत याव्या म्हणून वागणुकीबद्दल मी बारा आज्ञा केल्याः
(१) प्रत्येक प्रांताच्या किंवा जिल्ह्याच्या जहागीरदाराने स्वतःच्या फायद्यासाठी बसविलेल्या जकातीस बंदी करण्यांत आली.
(२) ज्या रस्त्यावरून रहदारी कमी आणि चोच्या जास्त होतात अशा ठिकाणों आरामगृहें, मशिदी, विहिरी, इत्यादि जहागीरदारांनीं बांधाव्या. यायोगाने लोकांना तेथे कायमची वस्ती करण्यास उत्तेजन मिळेल.
| (३) व्यापा-यांच्या परवानगीशिवाय त्याच्या मालाच्या गांठी रस्त्यावर फोडून पाहूं नयेत..
(४) मृत व्यक्तींची संपत्ति-मग तो मुसलमान असो किंवा अन्य कोणत्याहि धर्माचा असो-अडथळे न होतां त्याच्या वारसास मिळावी; वारस नसल्यास लोककल्याणार्थ त्या संपत्तीचा उपयोग व्हावा म्हणून विश्वस्ताकडे द्यावी.
(५) दारू किंवा इतर मादक द्रव्ये कोणी विकू नयेत अथवा करू नयेत. मी अठराव्या वर्षी दारू पिऊ लागलों व सध्यांहि पितों.
..गेली सात वर्षे निग्रह करून मी १५ कपांऐवजी ५-६ कपच पितो. आतां फक्त अन्नपचनार्थ हें पान चालू आहे.
(६) कोणाचेहि घर जप्त केले जाणार नाहीं. ४६]
पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/162
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
