पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/161

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जहांगीरच्या आज्ञा १२९ हे दीनदयाळा, पाप, दारिद्रय आणि दुःख या त्रिविध तापाने पृथ्वी होरपळली आहे. ब्राह्मण हे ईश्वरस्वरूप आहेत असे वेदांचे वचन आहे; परंतु आज ( काय दिसत आहे ) हेच ब्राह्मण रागीट, लोभी व गवष्ठ झालेले आहेत. त्याच प्रकारे क्षत्रियवर्ग. हा वर्ग, अन्याय, अत्याचार, व्यभिचार इत्यादि अनाचार आचरीत आहे. जिकडेतिकडे नास्तिकवाद पसरला आहे. वर्णाश्रमधर्माचा नाश होत आहे. लोक पाखंडी झालेले असून पापरत आहेत. | शांति, सत्य यांना मान नाहीं. कपट वाढलें व साधूना त्रास होऊ लागला आहे; परंतु दुष्ट लोकांना सुख प्राप्त झाले आहे. परमार्थाच्या नांवाखाली स्वार्थसाधनच होऊ लागले आहे. कलियुगाचा प्रताप कोठवर वर्णावा ? हे प्रभो थोडा क्रुद्ध होऊन या कलीला जरा धाक दाखवः तू नुसते बोट वर केलेस तरी तो निःसत्त्व होईल. हे परमेश्वरा, न्याय कर, नाहींतर पृथ्वीवरील आनंद नष्ट होईल | अभ्यास :-- १. तुलसीदासाच्या सुमारास तुकाराम-रामदास होऊन गेले. त्यांनीहि वर्णाश्रमाची दुःस्थिति वणली आहे. (मराठे कालांतील उतारे वाचा.) हे दोन्ही उतारे वाचून १५७५ ते १६२५ या काळांतील समाजस्थितीचे त्रोटक वर्णन करा. ई २९ । । । । जहांगीरच्या आज्ञा [ प्रस्तुतचा उतारा मूळचा ‘जहांगीरच्या आठवणी' या ग्रंथांतला रोजर्स आणि बीव्हरीज यांनी त्या ग्रंथाचा अनुवाद केला आहे. त्यांतील उतारा लेनपूलकृत ‘मेडीव्हल इंडिया' पृ. ८३-८४ वर आहे, तो येथे अनुवादित करून दिला आहे. । | ‘जहांगीरचे आत्मचरित्र अथवा आठवणी' या नांवाने दोन तीन भाषांतरित ग्रंथ उपलब्ध आहेत. भाषांतराची भिन्नता लक्षात घेतलीत री या ग्रंथांचे मूळ एक नसले पाहिजे हे स्पष्ट दिसते. खरा प्रकार असा आहे की, या बादशाहाने लिहिलेली प्रथमपुरुषी आत्मचरित्रे हीबहुधा लेखकांकडून लिहविलेली (आत्म) चरित्रे आहेत. असे दिसतें कीं, जहांगीरने आपल्या [ ४५