१२८ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास केव्हां आलें ? ७. हिंदू धर्माचा पगडा त्याच्या मनावर बसला हे कोणत्या उदाहरणांनीं बदाउनीने सिद्ध केले आहे ? ८. 'या सर्वांचा परिणाम त्याच्या वृत्तींत दिसून येतो' हे २६ वा उतारा वाचून सिद्ध करा. ९ “ धर्मजिज्ञासु अकबर' यावर मुद्देसूद तीन परिच्छेद लिहा. २८ । । । सोळाव्या शतकांतील समाजस्थिति [संत तुलसीदास हा हिंदी भाषी संतकवि १६ व्या शतकांत होऊन गेला. तीर्थयात्रेच्या निमित्ताने रामेश्वरापर्यंत त्याने प्रवास केला होता. तुलसीदासाने संस्कृत भाषेत ग्रंथ न रचितां लोकभाषेत म्हणजे हिंदींत चौदा ग्रंथ लिहिले. लोकभाषेबद्दल तो म्हणतोः का भाषा, का संस्कृत, भाव चाहिये साँच काम जो आवे 'कामरी क्या ले करे कमांच आपल्याकडील महाराष्ट्रीय संतांप्रमाणेच लोकवाणीचा हा अभिमान उल्लेखनीय होय. त्याने चौदा ग्रंथ लिहिले, त्यांत 'रामचरित मानस' नि ‘विनयपत्रिका' हे प्रमुख होत. रामचरितमानस म्हणजे रामायण. रामचरित्र सांगत असतांच शील, सदाचार, पावित्र्याची थोरवी, लोकसंग्रहवृत्ति यांचे महत्त्व त्याने सांगितले. तत्कालीन समाजाचे मनोगत त्याने व्यक्त । केलें म्हणून त्यास प्रातिनिधिक कवि मानतात. परकीय राजे अस• तांहि आपल्या धर्मावर अढळ श्रद्धा ठेवण्याची शक्ति त्याने समाजांत निर्माण केली. त्याचा रामचरितमानस हा ग्रंथ आबालवृद्धांस परिचित आहे. उत्तरेत घरोघर हे रामायण श्रद्धेने आजहि वाचले जाते. रामभक्तीचा प्रचार त्यामुळे फार झाला. | विनयपत्रिकेंत परमेश्वराची त्याने अनेक प्रकारे प्रार्थना करून स्वतःचा उद्धार करा अशी विनवणी केली आहे. या ग्रंथांतील क्रमांक १३९ चें पद्य पुढे दिले आहे. त्यांत कलियुगाचे वर्णन करता करतांच सभोंवतालच्या तत्कालीन समाजाचे वर्णन त्याने केलेले आहे असे हिंदीभाषी म्हणतात. तुलसीदास हा इ. स. १६२४ सालीं मृत्यु पावला. ] १. कांबळे, घोंगडी. २. एक प्रकारचे रेशमी कापड. - [४४
पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/160
Appearance