पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अकबराने केलेले नवीन नियम १२७ क्रूस दाखविणे, खिस्त्यांप्रमाणे घंटा वाजविणे......अशा बालिश गोष्टी येथे नित्य घडू लागल्या. स्वतःच्या चुलतघराण्यातील किंवा आप्तांतील मुलीशी विवाह करण्यास बंदी करण्यांत आली•••••••••• • • • • • सोळा वर्षांच्या आंत मुलांनीं व १४ वर्षांच्या आंत मुलींनी लग्न करू नये. पुरुषाने एकापेक्षा अधिक स्त्रियांशों लग्न करू नये, अपवाद म्हणजे मूल होत नसेल तरच. विधवांना पुनववाह करण्याची इच्छा असल्यास हिंदूंच्या कल्पनाविरुद्ध ते असले तरी परवानगी देण्यात आली. गेला सती जावयाचे असल्यास तिला अडथळा करू नये पण नसल्यास सक्ति करू नये. (१०) बादशाहाने ठरविलें कीं तरुण असतांना जबरदस्तीने जे हिंदू मुसलमान झाले असतील त्यांना आपल्या पूर्वीच्या धर्मात परत जाण्यास परवानगी मिळावी. तसेच कोणाहि मनुष्यास त्याच्या धर्मकार्यात अडथळा केला जाऊ नये. कोणासहि त्याला वाटल्यास धर्म बदलण्याची परवानगी असावी. जर एखाद्या हिंदु स्त्रीने मुसलमानाशी विवाह केला आणि धर्म बदलला तर त्याच्याकडून तिला जबरदस्तीने परत आणून तिच्या हिंदु कुटुंबांत परत द्यावी. (याचप्रमाणे एखाद्या मुसलमान स्त्रीने हिंदूशी विवाह केला तरीहि करावें )--कोणालाहि मूर्तिमंदिरें, अग्निमंदिरें, प्रार्थनामंदिरे अगर चर्च बांधण्याची इच्छा असल्यास त्यास अटकाव करू नये. अभ्यास :--१. अकबरानें इबादतखाना कां बांधला ? २' पैदर रोडोल्फ'ने सांगितलेले दिव्य करण्याचे इतरांनी नाकारले हे योग्य कां अयोग्य? विरोधकांच्या नकाराचा बादशाहाच्या मनावर काय परिणाम झाला ? ३ वरवरचे धर्मपालन निरुपयोगी आहे असे अकबरास कां वाटलें ? ४. अकबराच्या मते चित्रकलेचा फायदा कोणता ? त्याच्या मनांत ईश्वरविषयक विचार चालले होते म्हणून चित्रकलेतहि तोच संदेश त्यास मिळाला हे म्हणणे कितपत खरे आहे ? ५. सद्धर्मा' वरील अकबराचा विश्वास कसा उडाला असे बदाउनी सांगतो. ६. 'सत्य' सर्व धर्मात आहे हें अकबराच्या लक्षांत [४३