पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास दिशेस सूर्योदय होतो. दरबारांतील कित्येक विद्वानांनी त्यास पाठिंबा दिला आणि सांगितले की, सूर्य हा राजाचा मित्र आहे, कारण तो आपल्या गतीने संवत्सरें व युग ठरवितो. अकबराने सूर्यपूजा करण्याचे व नवरोझचा सण साजरा करण्याचे हेच कारण घडले. त्या त्या दिवसाचे स्वामी असे जे ग्रह असतील त्यांना अनुकूल अशा रंगाचा पोशाख तो करी व सूर्यदेवतेची कृपा व्हावी म्हणून तो कांहीं हिंदु पद्धतीचे मंत्रहि पुटपुटत असे. गोहत्या व गोमांसभक्षण त्याने बंद केले. तरुणपणापासून राजपूत स्त्रियांच्या भावनांना मान देण्याकरितां तो होमवहन करीत असे. परंतु राज्यारोहणाच्या २५ व्या वर्षी झालेल्या नवरोझच्या सणाच्या दिवशी त्याने जाहीर रीत्या होम केला व सूर्यास साष्टांग नमस्कार घातला. सायंकाळी जेव्हां दिवे लागले, तेव्हां आदरार्थ दरबारांतील सर्व समाजास उठून उभे रहावे लागले. एके दिवशीं तो हिंदूप्रमाणे कपाळास गंध लावूनच दरबारात आला. त्या वेळी त्याने मनगटांत रत्नजडित अनंत बांधला होता. अशा रीतीने सद्धर्माला विरोधी व तिरस्कार करणारे, पण इतर धर्मानीं पुस्कारिलेले असे आचार त्याला नेमके पटत व तो ते आचरणांत आणी. प्रारंभी त्याचा तिकडे नुसता कल होता, पण पुढे तर त्या त्या धार्मिक तत्त्वावर त्याचा अढळ विश्वास बसत गेला. अकबराने केलेले नवीन नियम [प्रा. शर्माकृत ‘क्रेसेंट इन इंडिया' भा. २ पृ. ४०९-४१० वर बदौनिच्या दिलेल्या उता-यांतून ही निवडक कलमें दिली आहेत. ] वादशाहाच्या हुकुमानें गोमांस खाण्यास बंदी करण्यांत आली. इतकेच नव्हे तर गोमांसाचा स्पर्श हि अपवित्र मानण्यांत आला. याचे खरे कारण असे आहे कीं, हिंदु स्त्रियांच्या सहवासांत तरुणपणापासून राहिल्यामुळे त्यास गाय पवित्र वाटू लागली. जनानखान्यांतील हिंदु स्त्रियांचा पगडा त्याच्या मनावर इतका होता की, त्याने गोमांस, कांदे, लसूण खाण्याचे बंद केले. याच कारणाने त्याने दाढी ठेवण्याचे बंद केलें. । ४२]