पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/157

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अकबर अधामिक बनत चालला १२५ होई. त्यामुळे (त्याचा) सद्धर्मावरील विश्वास उडू लागला आणि धर्मनियमांच्या मर्यादा ढासळून गेल्या. ५-६ वर्षांच्या अवधींत इस्लामाचे एकहि लक्षण बादशाहांत उरलें नाहीं. . निरनिराळ्या देशांतून विविध धर्माचे अभ्यासक दरबारी येत. त्यांच्याशी राजा संभाषण करी. रात्रंदिवस ते लोक चर्चा आणि शोध याखेरीज कांहीं करीत नसत. त्याने त्यांपैकी प्रत्येकाची विशेषतः मुस्लिमेतरांचीं मते जमविली व त्यांतील त्याला ग्राह्य तेवढी ठेवून बाकीची ( त्याच्या मनाविरुद्ध होती ती ) त्याने त्याज्य ठरविलीं. लहानपणापासून धर्माच्या अनेकविध पंथोपपंथांतून त्याचे आयुष्य गेले होते. त्याने स्वतःच्या तीक्ष्ण बुद्धीने पुस्तकांतील ज्ञान संपादन केले होते. हळूहळू त्याच्या मनाला असे वाटू लागलें कीं, सर्व धर्मात सूज्ञ माणसे आहेत. अशा त-हेने जर सगळीकडे एकच सत्य सांपडले तर ते केवळ एकाच धर्मात किंवा सहस्र वर्षेहि न झालेल्या केवळ इस्लाम धर्मातच आहे हे म्हणणे कितपत संयुक्तिक असू शकेल? सामानी ( साधु, संन्यासी ) व ब्राह्मण यांच्याशीं तो खाजगी चर्चा करी. त्यांची विद्वत्ता व आत्मिक बळ यामुळे बादशाहाचे मन स्थिर वृत्तीचे झालें. (साहजिकच) कुणाच्या शंकाकुशंकांमुळे त्याचे चित्त विचलित होत नसे.....हिजरी ९८६ मध्ये ( इ. स. १५७७ ) युरोपांतील मिशनरी, ज्यांना पादरी असे म्हटले जाते, तसेच ज्यांच्या मुख्यास पोप असे म्हणतात,.....ते बादशाहाकडे आले. राजाने शहाजादा मुरादला त्या धर्मातील कांहीं तत्त्वे आदरपूर्वक शिकण्यास सांगितले आणि अबुल फजलला त्याच्या ईश्वरी संदेशाचे भाषांतर करण्यास सांगितले. ( प्रार्थनेच्या ) प्रारंभीं बिस्मिल्ला म्हणण्याऐवजी ' हे झीजस आणि हे ख्रिस्ता' असे म्हणण्यास आरंभ झाला. त्या द्वाड बिरबलने बादशाहाच्या मनांत असे भरवून दिले की सूर्याची पूजा राजाने केली पाहिजे; कारण सूर्यामुळेच प्रकाश मिळतो, त्याच्यामुळेच धान्य, फळे, इ. खाद्य वस्तु पृथ्वी निर्माण करू शकते आणि अशा त-हेनें मानवी जीवनाचा तोच आधार आहे. त्याने असेहि सुचविलें कीं पश्चिमेकडे तोंड करून (दरबारांत) न बसतां पूर्वेकडे तोंड केले पाहिजे, कारण त्या [४१।