पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अकबर अधामिक बनत चालला १२३ किरणांनी माझे मन प्रकाशित झाल्यामुळे माझी अशी खात्री झाली आहे कीं, अज्ञानतमाचा नाश करणा-या मशालीखेरीज एकहि पाऊल पुढे टाकतां येणार नाही.....आपण पारखून घेतलेली जी श्रद्धा तीच खरी लाभकारक होत असते. धर्मग्रंथांतील शब्द घोकणे किंवा राजभयाने जमिनीवर लोटांगण घालणे म्हणजे ईश्वराप्रत जाणे नव्हे. २५ । । । अकबर व चित्रकार [ ऐने अकबरींतील प्रस्तुतचा उतारा लेनपूलकृत · मेडिव्हल इंडिया' पृ. ७६ वरून येथे दिला आहे.] आपल्या अनेक सहका-यांबरोबर खेळीमेळीने चर्चा करीत असतां एक दिवस बादशाह अकबर म्हणाला, " कांहीं जण चित्रकलेचा द्वेष करतात, पण मला अशा लोकांचाच राग येतो. मला तर असे वाटते कीं, ईश्वराला ओळखण्याचे एक विशेष साधन चित्रकाराजवळ असते. कोठल्याहि जीवित वस्तूचे चित्र रेखाटत असतांना व आपल्या कुंचल्याने एकेक अवयव रंगवीत असतांना चित्रकारास त्या चित्रास सजीवतां आणतां येत नाही, याची जाणीव तीव्रतेने होते. अशा त-हेनें जीवनदात्या परमेश्वराबद्दल विचार करणे त्याला भाग पडते व साहजिकच त्यास त्याचे अधिक ज्ञान होते. २६ । । । अकबर अधार्मिक बनत चालला बदाउनीची तक्रार : अकबराचा धर्मावरील विश्वास उडत चालला ! [बदाउनी हा अकबराचे पदरीं होता. त्याने गज्नीच्या सुलतानापासून अकबराचे कारकीर्दीतील इ. स. १५९५ पर्यंतच्या काळचा इतिहास लिहिला आहे. हा इ. स. १५४० मध्ये जन्मला व इ. स. १६१५ त मृत्यु पावला. बदाउनीच्या इतिहासांत मुख्य भर मोगलांच्या हकीकतीवरच आहे. एकंदर ४०० पृष्ठांत सुमारे ६५ पृष्ठे बाबर ते अकबर व सुमारे २०० हून अधिक खास अकबराची कार [३९