१२२
हिंदुस्थानचा साधनुरूप इतिहास
तेथील चर्चेत अनेक तत्त्वज्ञांचे पांडित्य कसास लागले. त्या राजगृहांत जमलेल्यांत सुफी, ज्ञानी, वक्ते, वकील, सुन्नी, शिया, ब्राह्मण, यति, जैन, चार्वाक, ख्रिश्चन, ज्यू, सेबियन, झरतुष्ट्रपंथी किंबहुना प्रत्येक पंथाचे विद्वान् होते.
निःपक्षपाती भूपति सिंहासनावर बसलेला पाहून सर्वांस मोठा आनंद झाला.
प्रत्येकाने निर्भयपणे आपले सिद्धांत व मुद्दे मांडले. वादविवाद लांबला, वातावरण गरम झालें....
एका रात्रीं या इबादतखान्यांत पेदर रोडोल्फ हजर होता. ख्रिस्ती धर्मोपदेशकांत त्याची कोणी बरोबरी करील असा नव्हता. धर्माधि लोक आपले टीकास्त्र चालविण्यास तेथे सज्ज होतेच. त्यांनी त्याच्यावर हल्ला चढविला. आपली जुनी चर्पटपंजरी चालवून पूर्वीचेच सिद्धांत त्यांनी पुनः पुढे मांडले. त्यांनी सत्यान्वेषणाची खटपटहि केली नाही. त्यांच्या विधानांच्या चिंधड्या उडविण्यांत आल्या व अखेर ते शरमून निष्प्रभ झाले. तेव्हा त्यांनी * गॉस्पेल' मधील परस्पर विसंगत मुद्दयावर चढाई केली; परंतु त्यांना आपले म्हणणे सिद्ध करून विरोधकांना गप्प बसवितां आलें नाहीं.
अगदी शांतपणाने व आत्मविश्वासाने पेदरने सर्व मुद्दयांना उत्तरे दिली. तो म्हणाला, " आमच्या धर्मग्रंथाबद्दल या लोकांची जर अशी मते असतील व त्यांना जर कुराण तेवढेच ईश्वरप्रणीत सत्य वाटत असेल तर त्यांना माझे असे आव्हान आहे कीं, अग्नि पेटवा आणि आम्ही आपला धर्मग्रंथ बायबल घेऊ, उलेमांनी आपल्या स्वत:च्या हातांत स्वत:चे धर्मपुस्तक घ्यावे व दोघांनीं या दिव्यांतून जावे; म्हणजे सत्य आपोआप बाहेर पडेल." कृष्णहृदयी हलकट वावदूकांना ही सूचना आवडली नाही, आणि ते तावातावाने बोलू लागले. घाबरटपणा आणि ही अरेरावी निःपक्षपाती राजाच्या मनाला बोचली. ।
खोल विचार करून चिकित्सक वृत्तीने तो म्हणाला, " लोकांना असें । वाटतें कीं, मनांत विश्वास नसतांहि वरवर इस्लामचा धर्म पाळला तरीसुद्धा त्यांचा फायदा होईल. माझ्या सामर्थ्याच्या जोरावर कित्येक हिंदूंना मी माझ्या पूर्वजांचा धर्म स्वीकारण्यास भाग पाडले; परंतु आतां ज्ञान
३८]
पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/154
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
