पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ई ईश्वरपूजनाचा दिवाणखाना १२१ तरुणपणापासूनच बादशाहाला विद्वान् आणि प्रतिभावान् लोकांच्या सहवासांत राहण्यांत तसेच बुद्धिमान् लोकांच्या सभा भरविण्यांत आनंद वाटत असे. अशा लोकांना तो अत्यंत सन्मानाने वागवी. त्यांनी चालविलेल्या वादविवादांतील बारीक मुद्यांची चर्चा--मग हे मुद्दे शास्त्र, प्राचीन किंवा अर्वाचीन इतिहास, धर्म आणि पंथ, यांपैकीं असोत–तो लक्षपूर्वक ऐकत असे. या श्रवणभवतीचाहि त्यास फायदा झाला. ९८२ हिजरीच्या शेवटीं म्हणजे त्याच्या कारकीर्दीच्या विसाव्या वर्षी अजमीरहून परत आल्यावर त्याने आपल्या कुशल वास्तुशास्त्रज्ञांना फत्तेपूर शिक्री येथील राजबागेमध्ये एक मंदिर उभारण्याची आज्ञा केली. या मंदिरांत केवळ पवित्र लोक म्हणजे सुप्रसिद्ध सय्यद, उलेमा, शेख यांनाच प्रवेश मिळावयाचा होता. स्थापत्यशास्त्रज्ञांनी चार दिवाणखाने असलेली इमारत योजिली. जेव्हां ती पूर्ण झाली तेव्हां तेथे प्रत्येक शुक्रवारच्या पवित्र रात्री बुद्धिमान् लोकांच्या संगतींत बादशाह पहाटेपर्यंत बसत असे. या लोकांची सरमिसळ न करितां सय्यदांना पश्चिमेकडील भागांत आणि उलेमांना दक्षिणेकडे, शेख व तत्त्वज्ञानी लोकांना उलेमाच्या पलीकडे बसण्याची व्यवस्था असे. पूर्वेकडील भागांत दरबारचे अधिकारी नि सरदार बसत. प्रत्येक विभागांत राजा जाई व विद्वानांची संभावना करी. ही विद्वान् मंडळी आपल्यामधूनच विशेष योग्य लोकांची निवड करून त्यांना राजाकडे पाठवीत व राजा त्यांना ओंजळीने पैसे देई; ज्यांना अशा त-हेने प्रवेश मिळत नसे ते या इबादतखान्याच्या बाहेर प्रत्येक शुक्रवारी रांगा करून बसत. बादशाह त्यांचाहि योग्य परामर्ष घेत असे. दुपारपर्यंत हें कार्य चाले. त्यानंतरचा दान-धर्म तो आपल्या नोकरावर सोपवी. 2 I0 २४ । । । धर्मसभेतील वर्दळीचा वादविवाद [ अकबरनाम्यांतील उतारा, इ. डी. व्हॉ. ६ पृ. ५९ ] अकबर परत फत्तेपूर शिक्रीला आला, तेव्हां पुन्हा दर शुक्रवारी रात्रीं धर्म चर्चेचा दीप राजगृहांत प्रकाशमान झाला. ३ ऑक्टोबर १५७८ रोजी ही एकान्त वासाची राजधानी पुनः चार लोक आल्याने गजबजली व [ ३७