पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास वाहनांची काय माहिती फिच सांगतो ? ३. तत्कालीन इतर प्रवाशांची माहिती सांगा. ४. तुम्ही राहता त्या अगर जवळच्या तत्कालीन शहराचा विस्तार, लोकसंख्या वगैरे माहिती मिळविण्याचा यत्न करा. धर्मजिज्ञासू अकबर -उतारे क्रमांक २३, २४, २५, २६, २७, हे एकाच विषयावर समकालीन पण भिन्नवृत्तीच्या लेखकांचे आहेत. सम्राट अकबराच्या मनांत सर्व धर्मातील तत्त्वांबद्दल आदर कसा निर्माण झाला हे त्याचा मित्र व सल्लागार अबुल फजल आणि त्याच्यावर टीका करणारा बदाउनी यांनी लिहिलेल्या लिखाणांतून स्पष्ट होईल. याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणजे २७ व्या उता-यांत अकबराचे उद्योग आणि दिन-इ-इलाही धर्माची स्थापना होय. ईश्वरपूजनाचा दिवाणखाना [ प्रस्तुतचा उतारा निझामउद्दीन अहंमद बक्षीकृत ' तबकत -इ-अकबरी' या ग्रंथांतून घेतला आहे. हा निझामुद्दीन अकबराचे कारकीर्दीत इ. स. १५९४ चे सुमारास मृत्यु पावला. अकबराच्या कारकीर्दीत त्याने गुजराथचे सुभ्यावर बक्षीगिरीचे काम केले. इ. स. ९५८ पासून ते इ. स. १५९३ पर्यंतच्या काळाचा सर्व हिंदुस्थानची इतिहास उपलब्ध नाहीं. तो लिहावा म्हणून याने तबकत-इ-अकबरी हा ग्रंथ लिहिला असे त्याने म्हटले आहे. तबकत-इ-अकबरी या ग्रंथांस तारीख-इ-निझामी असेंहि त्याच्या कत्र्यावरून नांव पडल आहे. अबुल फजलकृत अकबरनामा व तबकत या ग्रंथांत ठिकठिकाणी तपशिलांत वेगळेपण दिसून येते. त्यांतील सत्य शोधून काढणे हे वाचकांचे काम आहे. समकालीन लेखक बदाउनी याचे निझामउद्दीनवर फार प्रेम होते. फिरिस्त्यासारख्या पुढील लेखकांस तबकतइ-अकबरीचा फार उपयोग झालेला आहे. प्रांताप्रांताचा इतिहास लिहून झाला, पण सर्व हिंदुस्थानचाकीं जो सुदैवाने आज एका बादशाहाच्या अंमलाखालीं आहे--त्याचा इतिहास लिहावा है। त्याचा उद्देश त्याने स्पष्टपणे व्यक्त केला आहे. यावरून तत्कालीन इस्लामी लेखकासहि हिंदुस्थानच्या एकत्वाबद्दल संशय नव्हता असे म्हणता येते. इ. हौ. व्हॉ. ५ पृ. १७७ पहा. ] नवर फा-"म आहे. स्वत: त्यांत या ग्रंथांत ३६]