पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अकबरकालीन आग्याचे वैभव ११९ लेला एक मजबूत किल्ला आहे. या शहरांत पुष्कळ मुसलमान व हिंदु राहतात. राजाचे नांव जलालुद्दीन अकबर असे आहे. लोक त्याला साधारणपणे ‘बडा मोगल' असे म्हणतात. | तेथून आम्ही फत्तेपूरला गेलों. या ठिकाणी राजाचा दरवार भरतो. आग्न्यापेक्षा हे शहर विस्तीर्ण आहे. परंतु घरे व रस्ते मात्र तितके स्वच्छ नाहींत. येथेहि मुसलमान व हिंदूची वस्ती पुष्कळ आहे. | आग्रा व फत्तेपूर येथील लोक सांगतात की, राजाजवळ एक हजार हत्ती, ३० हजार घोड, १४०० हरणे, कांहीं चित्ते, वाघ, रेडे (युद्धांत उपयोगी पडावेत म्हणून) याशिवाय कोंबडे, बगळे इत्यादि (प्राणी) आहेत. । ज्या ठिकाणी राजाचा मोठा दरबार भरतो त्यास ते लोक 'दरीखाना' [ राजवाडा ] असे म्हणतात. | आग्रा आणि फत्तेपूर ही दोन शहरे मोठी आहेत. या दोहोंपैकी कोणतेहि शहर* लंडनपेक्षा अधिक विस्तीर्ण आणि लोकवस्तीने भरगच्च असे आहे. आग्रा आणि फत्तेपूर यांमधील अंतर बारा मैल आहे. हा सर्व रस्ता दुकानांनी भरलेला आहे. रस्त्याने जातांना जणू काय आपण शहरांतच आहोत असे वाटते. येथील नागरिकांजवळ सुंदर वाहने आहेत. कित्येकांवर खोदकाम केलेले असते व सोन्याचा मुलामा दिलेला असतो. या वाहनांना दोन चाके असून इंग्लंडांतील आपल्या मोठ्या आकाराच्या कुत्र्याएवढ्या दोन लहान बैलांनी हीं वाहने ओढली जातात. या ठिकाणीं इराणहून व हिंदुस्थानच्या बाहेरील इतर देशांतून आलेले पुष्कळ व्यापारी आहेत. रेशीम, कापड, मोती, हिरे, पाचू आणि अन्य मौल्यवान् रत्नांचा व्यापार येथे चालतो. अभ्यास :--१. तत्कालीन लंडनपेक्षा आग्रा व फत्तेपूर ही शहरें कोणत्या बाबतींत श्रेष्ठ होती ? आजची स्थिति काय आहे ? २. मोगलकालीन

  • * इ. स. १५८० मध्ये लंडनची लोकसंख्या १,२३०३४ आणि .स. १५९३ ते ९५ मध्ये १,५२४७८ होती. व्हिन्सेंट स्मिथच्या म्हणण्याप्रमाणे फत्तेपूरची लोकसंख्या सन १५८५ मध्ये सुमारे दोन लक्ष असावी. -- प्रा. एस्. आर्. शर्मा–दि क्रेसन्ट इन् इंडिया, पृ. ३८३.

[ ३५