पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/150

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११८ २२ चला. तेथे सोचाबहार, चितरा ९" एकटाच तेथन । असमुद्रमार्गे कोचीन इन परत पेगूवरून पर्यंत पोहों हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास । । अकबरकालीन अग्न्याचे वैभव [ प्रस्तुतचा उतारा राल्फ फिच या इंग्रज प्रवाशाने लिहिलेल्या वृत्तांतून घेतलेला आहे. इंग्लंडहून हिंदुस्थानकडे प्रथमच चार प्रवासी इ. स. १५८३ च्या फेब्रुवारीत टायगर नांवाच्या जहाजांत बसून निघाले. त्यांची नांवें न्यूबरी, फिच्, लीडस् व स्टोरी. हे सर्व भूमध्य समुद्रांतून सीरियांत आलेप्पो येथे आले व तेथून बसरा व तेथून ऑम्झेला पोहोंचले. तेथे पोर्तुगीजांनी त्यांस व्यापारी मत्सरामुळे अटक केली व गोव्यास नेले. त्यांची १५८३ च्या वर्ष अखेरीस सुटका झाली. पुढील त्रास वाचविण्यासाठी ते पळून विजापुरास गेले. तेथून गोवळकोंडा, ब-हाणपूर, उज्जनी या मार्गाने आग्यास पोहोंचले. अकबर त्या वेळी फत्तेपूर शिक्री येथे होता. तेथे बादशाहाची व त्यांची भेट झाली किंवा नाहीं ते कळत नाही. पण फिव हा एकटाच तेथून बंगालकडे निघाला. तेथून तो कुचबिहार, चितगांवपासून मलाक्कापर्यंत पोहोचला. तेथे सात आठवडे राहून परत पेगूवरून बंगालकडे आला. तेथून तो समुद्रमार्गे कोचीन व गोवा येथे आला. बयाच अडचणींतून अखेर १५९१ च्या एप्रिलांत आठ वर्षांनी लंडनला पोहोचला. इंग्लंडमधून १५८३ त निघण्यापूर्वी त्याने मृत्युपत्र केले होते. बरींच वर्षे इंग्लंडमध्ये त्याचे कांहींच वृत्त न कळल्याने तो मेला असें समजून त्याच्या मृत्युपत्राची अंमलबजावणीहि झालेली होती ! " फिचचे प्रवासवृत्त प्रथम रिचर्ड हॅक्लुइट (१५९८-१६००) यांनीं 'प्रिन्सिपल नॅव्हिगेटर' या पुस्तकांत प्रसिद्ध केले. हे प्रवासवृत्त अत्यंत त्रोटक आहे. कारण फिचला लेखनाचा सराव नव्हता व त्याने रोजनिशीहि लिहून ठेवली नव्हती. जें कांहीं आठवलें तें त्याने लिहून काढले व लिहितांना पूर्वीच्या फेडरिक या इटालिअन प्रवाशाच्या वृत्ताला धरून लेखन केले आहे. हा फेडरिक इ. स. १५६३ मध्य हिंदुस्थानांत आला होता. इंग्लंडच्या पहिल्या प्रवाशाने लिहून ठेवलेले प्रवासवृत्त या दृष्टीने यास महत्त्व आहे. 'अर्ली ट्रॅव्हल्स इन इंडिया, संपादक विल्यम फॉस्टर, ऑक्सफर्ड प्रेस' या ग्रंथांत अशा इंग्रज प्रवाशांची प्रवासवृत्ते वाचावयास मिळतील. (उतारा-कित्ता पृ. १७)] आग्रा में शहर फार मोठे आहे, तेथे पुष्कळ वस्ती आहे. रस्तेहि चांगले रुंद वे फरसबंद आहेत. शहराच्या जवळून चांगली नदी वाहते. ही नदी पुढे बंगालच्या उपसागरास मिळते. या शहरास सभोंवतीं खंदक अस इंग्लंडमधुमध्ये त्याचे अंमलबजावईबलुइट। ३४]