पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८) त्या आधाराचा निर्देश करण्याचे सोडलें नाहीं. मिळेल तेथे साधन ग्रंथांतील उतारा मूळ ग्रंथांतून ताडून पाहिला, पण सर्वच ठिकाणी हे जमलें नाहीं पुस्तक शालोपयोगी म्हणून लिहिले असले, तरी सामान्य वाचकांस त्याने हिंदुस्थानच्या इतिहासाचे अंतरंगदर्शन होणार आहे व अभ्यासकास संदर्भ ग्रंथ म्हणून त्याचा उपयोग होईल. तसेच हिंदुस्थानच्या इतिहासावरील पुस्तकांचा संग्रह करावयाचा झाला तर कोणती पुस्तकें पाहिजेत तेहि कळून येईल. प्रस्तुतचे पुस्तक तयार करतांना अनेकांचे साह्य झाले. ज्यांचे साहय वारंवार प्रेमाच्या हक्काने मागावे व मिळावे असे आमचे अभ्यासक मित्र श्री. शंकरराव जोशी व श्री. ग. ह. खरे, यांच्याखेरीज रियासतकार श्री. गो. स. सरदेसाई, श्री. बाळ गांगल, श्री. गो. अ. गद्रे, उपनिषद् तीर्थ जोग, प्राचार्य दांडेकर यांचे आभार मानणे अवश्य आहे. साधन ग्रंथ मिळविण्यास भा. इ. सं. मंडळ, सर परशुरामभाऊ कॉलेज व हिंदी प्रचार संघ पुणे यांच्या ग्रंथ संग्रहांचा भरपूर उपयोग झाला व तेथील ग्रंथपाल साहाय्यतत्पर राहिले याचा आम्ही आभारपूर्वक निर्देश करतो. प्रस्तुतच्या साधनग्रंथासारखी आणखी अनेक पुस्तकें तयार व्हावयास पाहिजेत, किंबहुना कालवार तीन चार खंडांतून हे सर्व व्हावे हा विचार पुस्तक तयार करतांना मनांत आला तो तूर्त व्यक्त मात्र करून ही प्रस्तावना संपवितों. अनंत १४, १८७१ शं. दा. चितळे पुणे २, ६-९-४९ रा. वि. ओतुरकर