पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हुमायनचा वनवास व प्रेमविवाह १११ सबब मी येणार नाहीं...." चाळीस दिवसपर्यंत बेगमनें वादविवाद केला तरी बादशाहाची विनंति मान्य करावी हे तिला पटेना. शेवटी माझी आई राणी दिलदार बेगम तिला म्हणाली “तू कोणाशी तरी लग्न करणारच ना ? मग राजापेक्षा अधिक कोण चांगला आहे ?" बेगम म्हणाली, "होय, मी कोणाशी तरी लग्न करणार आहे. पण तो मनुष्य असा असेल की, ज्याच्याशीं मला समानतेने बोलतां येईल. ज्याच्या पायाशींहि आपण पोहोंचू शकणार नाहीं असा तो नसेल माझ्या आईने तिला पुष्कळ समजाविलें. शेवटीं पुष्कळशा चर्चेनंतर ती कबूल झाली..... सप्टेंबर १५४१ मध्ये बादशाहाने योग्य मुहूर्त पाहून मीर आबूल बाबाला हा विवाह लावण्यास सांगितले. मीरला त्याने हुंड्यादाखल दोन लक्षांचे नाणे रोख दिले. विवाहानंतर तीन दिवस पत्र (patr) येथे राहून तो 'बखर' कडे बोटीने रवाना झाला. अभ्यास :--१. दोन्ही उतारे वाचून हुमायूनचे गुण-दोष वर्णन करा. २. राज्यकर्ता या नात्याने त्याच्या स्वभावामुळे त्याला कोणता त्रास झाला ? १८ । शेरशाहाची शेतक-यांबद्दलची काळजी [ तारीख-इ-शेरशाही हा ग्रंथ अकबराच्या आज्ञेवरून आब्वासखान शेरवानी याने लिहिला. लेखनकाल–बहुधा इ. स.१५७९. हा ग्रंथ अपूर्ण स्थितींत उपलब्ध आहे. लेखकाने त्यांत ठिकठिकाणी शेरशाह सर्व प्रसंग स्वतः वर्णन करीत आहे असे दाखविले आहे. प्रस्तुतचा व पुढील हे दोन्ही उतारे या ग्रंथांतील आहेत. सोळाव्या शतकाचे अखेरीस अफगाणिस्थानच्या सुलतानाचा सविस्तर इतिहास लिहिणारा अहमद यादगर याने आब्बासखानाच्या ग्रंथाचा उपयोग केला आहे. त्यास त्याच्या ग्रंथाची संपूर्ण प्रत उपलब्ध होती असे दिसते. ई. व डौ. व्हॉ. ४ पृ. ३०१.] । आपल्या जहागिरीची व्यवस्था पाहण्यास प्रारंभ केला त्या वेळी त्याने (शेरशाहाने) सांगितले की ज्यांच्या श्रमावर जिल्ह्यांची भरभराट अवलंबून आहे अशा किसानांना, गांवपाटलांना आणि गांवचे हिशेब ठेवणा-या पटवा-यांना (कुलकर्त्यांना) माझ्यापुढे वोलवा. [ २७