पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/141

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हुमायूनचा स्वभाव १०९. १६ । । । हुमायूनचा स्वभाव [ पुढील उतारा मिझ हैदर कृत तारीख-इ-रशिदी या ग्रंथांतून घेतला आहे. मिझ हैदर हा बाबरचा मावसभाऊ. हुमायूनशेरशाहाची गंगेवर जी लढाई झाली (इ. स. १५४०) तींत तो हजर होता. हुमायूनवर त्याचे फार प्रेम होते. त्याने पुढे कामरानच्या विरुद्ध हुमायुनास संकटांत साह्यहि केले; पण हुमायूनचे दुर्दैव अशा जिव्हाळ्याच्या मित्रयत्नास पुरून उरणारे होते. पुढे मिझ हैदरने हुमायूनचा नाद सोडला व आपण अवघ्या ४००० स्वारांनिशीं स्वारी करून काश्मीरचा सुलतान बनला. | तारीख--इ--रशिदी हा ग्रंथ कसोशीने लिहिलेला असून त्यांत मध्य आशियातील घडामोडींचे बरेंच व हिंदुस्थानांतील त्रोटक बर्णन आले आहे. बाबरच्या आत्मचरित्रास तो पूरक असा असून या दोहोंवरून तत्कालीन इतिहास समजण्यास फार मदत होते. इ. व डौ. व्हॉ. ५ पृ. १२७ पहा.] हुमायून हा बाबराच्या सर्व पुत्रांत ज्येष्ठ व सुप्रसिद्ध होता. नैर्सागक बुद्धिमत्ता व चांगुलपणा त्याच्याइतका फारच थोड्या लोकांच्या ठिकाणी मला आढळला; परंतु हलक्या लोकांच्या नादी लागून त्याला कांहीं व्यसने लागली आहेत; त्यांपैकीच अफू खाणें हें एक होय. बादशाहाच्या ज्या अनेक दोषांचा बझा झाला आहे, त्याचे मूळहि या अफूच्या व्यसनांतच शोधावे लागेल. असे असले तरी जन्मतःच त्याला चांगल्या गुणांची देणगी मिळालेली होती यांत संशय नाहीं. रणांत शूर, मित्रांत आनंदी आणि फार उदार असे त्याचे वर्णन करतां येईल. त्याला लव्याजम्याची आणि दरबारी थाटाची मात्र फार आवड असे. ज्या काळांत मी आग्यास त्याच्याकडे नोकरी पत्करली तो त्याचा पडता काळ होता. लोक म्हणत, सध्यांचा त्याचा थाट त्याच्या पूर्ववैभवाच्या मानाने कांहींच नव्हे ! अशा स्थितीत हि गंगेवरील लढाई जेव्हां झाली तेव्हां त्याच्या खाजगी नोकरींत १७००० लोक होते. यावरून त्याच्या बाकीच्या सरंजामाची कल्पना येईल. बादशाहाची आणि माझी चांगली गट्टी होती. तो मला ‘दोस्त असे म्हणत असे. कागदोपत्रींहि त्याच नांवानें बादशाहा माझा उल्लेख करी आणि सल्लाग र मंडळाच्या सभेतहि मला त्याच नांवाने संबोधी.