Jump to content

पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाबरच्या आत्मचरित्रांतील तीन प्रसंग १०७ होते. माझ्या सरदारांना माझा बेत रुचला नाहीं व बंधूनींहि विरोध केला म्हणून मी थबकलों. यामुळे हिंदुस्थानांतील प्रदेश माझ्या स्वारीच्या सपाट्यांतून वाचले. अखेरीस सर्व अडचणी दूर झाल्या. मला कोणी विरोधक उरला नाहीं. ९२५ हिजरी ( इ. स. १५१९) मध्ये आम्ही सैन्यासह निघालों. तोफा डागून बजौर घेतले. तेथील दोन तीन गढ्यांतून लोकांची कत्तल करीत आम्हीं भिरा येथे गेलो. तेथे आम्ही हल्ला केला नाहीं किंवा जाळपोळहि केली नाही, मात्र नागरिकांवर कर लादला. जमलेला पैसा सैनिकांस वाटला आणि काबुलला परतलो. तेव्हापासून आतां ( इ. स. १५२६ ) पर्यंत हिंदुस्थानची पाठ आन्हीं सोडली नाहीं. पांच वेळा त्यावर स्वाध्या केल्या. पांचव्या प्रसंगी ईश्वराने दया केली. सुलतान इब्राहिमसारख्या बलशाली शत्रूचा पराभव केला, आणि हिंदुस्थानांत आमची सत्ता स्थापन झाली. (२) बाबरचे हिंदुस्थानसंबंधीचे मत हिंदुस्थान हा देश सकृद्दर्शनीं आवडण्यासारखा नाहीं. तेथील नागरिक दिसण्यांत रुबाबदार किंवा सुरूप नाहींत; सामाजिक जीवनांतील मजा लटण्याची त्यांना कल्पना नाहीं; त्यांच्या ठिकाणी प्रज्ञेचा अभाव आहे. विश्वांतील विविधतेतून साम्य काढण्याचे कौशल्य नाहीं, शिष्टाचार नाहीं, स्वभावाचा गोडपणा नाहीं, सहानुभूतीची संवेदना नाहीं, कल्पकतेचा वकूब नाही, यांत्रिक शोधांत गति नाहीं, कारागिरीचे ज्ञान किंवा कौशल्य नाहीं. सोयिस्कर घरे, रुचकर फळे, बर्फ किंवा थंडगार पाणी ही तेथे एकंदरीत दुर्मिळच आहेत. तेथील बाजारहि यथातथाच. तेथे मिळते काय यापेक्षा मिळत नाहीं काय हेच हवे तर विचारून घ्या, (कारण बाजारांत आहेच काय मुळीं ! ) सार्वजनिक स्नानगृहे, उच्च शिक्षणाचीं विद्यालये हीं आढळणार नाहींत. इतकेच काय, पण मेणाचा दिवा किंवा मेणबत्तीचा तुकडा देखील नाहीं. रात्रीं तुम्हाला लिहीत किंवा वाचीतच बसावयाचे असेल तर जळती मशाल पेटवून ती हातांत घेऊन उभ्या असलेल्या अर्धनग्न कळकट नोकराचे सान्निध्य तुम्हास सहन केले पाहिजे !

२३ }