पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०६ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास प्रासाद कोठे बांधलेला होता ? बाजाराची व्यवस्था कशी होती? (२) तत्कालीन हिंदूंचे मोठे सण कोणते ? (३) युरेपियनांबद्दल विजयनगरांतील लोकांना काय वाटत असे ? (४) विजयनगरचे वैभव' यावर दोन परिच्छेद लिहा. १५ : : बाबरच्या आत्मचरित्रांतील तीन प्रसंग [ बाबरचे आत्मचरित्र, त्याचा पूर्वज तैमूर व वंशज जहांगीर यांच्या आत्मचरित्रांहून अधिक योग्यतेचे आहे. तैमूरच्या लेखनांतील श्रद्धाळूपणा हा कृत्रिम भासतो. जहांगीरचे लेखन आत्मप्रौढीचे आहे. इंग्रज लेखक, ‘हा ग्रंथ सीझरच्या आत्मचरित्राप्रमाणे सुरस' आहे असे म्हणतात. पण स्वतःच्या राजेपणाचा विसर पडून विषयाशी समरस होऊन लिहिण्यांत वावर सीझरहून अधिक वरचढ ठरेल असे हि त्याचे मत आहे. हे आत्मचरित्र मूळ तुर्की भाषेत असून त्याचे फारसी भाषांतर प्रथम अकबरास इ. स. १५९० त समर्पण करण्यांत आले. या ग्रंथाचे गुणग्रहण व त्यांतील एक उत्कृष्ट उतारा हिंदुस्थानच्या सोपपत्तिक इतिहासांत (पृ. १७६) दिला आहे. बाबरचे आत्मचरित्र संपूर्ण नाहीं. त्यांत इ. स. १५०३-४, इ. स. १५०८-१९ आणि इ. स. १५२० ते २५ हे काळाचे दुवे तुटलेले आहेत. पुढील उतारे या आत्मचरित्रांतून घेतलेले आहेत. ] (१) हिंदुस्थानावर स्वारी करण्याचा विचार ....शेवटीं सरदारमंडळांत असे ठरविण्यांत आले की, हिंदुस्थानवर स्वारी करावी. साबान ( हिजरी ९१० सन १५०५ जानेवारी ) महिन्यांत म्हणजे सूर्य कर्क राशीमध्ये असतांना आम्ही काबूलहून हिंदुस्थानांत यावयास निघालों. सहा टप्प्यांत अदिनापूर येथे येऊन पोहोंचलों. यापूर्वी मी कधींच उष्ण प्रदेश किंवा हिंदुस्थानची सरहद्द पाहिली नव्हती. निंगनहार येथे मी नवीनच जग पाहिले. निराळेच गवत, निराळी झाडे, निराळे प्राणी व पक्षी, फिरत्या टोळ्यांच्या वेगळ्या चालीरीति इत्यादि पाहून आम्हास आश्चर्य वाटले, खरोखरच आश्चर्य वाटण्यासारखी स्थिति होतीहि. १५०४ मध्ये काबूल घेतल्यापासून माझ्या मनांत हिंदुस्थान घेण्याचे २२ ]