विजयनगरचे वैभव
१०५
( India in the Fifteenth Century ) या पुस्तकांत इंग्रजीत रूपांतरित करून दिलेले आहे. रझ्झाक हा वकील म्हणून आलेला असल्याने त्याचा थेट राजापर्यंत प्रवेश सहजच झाला. अर्थात् त्याने लिहिलेल्या गोष्टी त्याने जातीने पाहिल्या आहेत. इ. व डौ. व्हॉ.४ पृ. ८९ व पृ. १०६ पहा ]
“ विजयनगर हे अशा प्रकारचे शहर आहे कीं, (माझ्या) डोळ्यांतील बाहुलीने त्याच्यासारखे स्थान अद्यापि कधीच पाहिलेले नाहीं व ज्ञानाच्या कानाने त्याच्यासारखे सा-या पृथ्वीतहि कांहीं असल्याचे कधी एकलेले नाही. त्याची बांधणी अशी आहे की, एकांत एक अशा सात तटांच्या भिंती त्यास आहेत. बाहेरील तटाच्या भोंवतीं पन्नास याडपर्यंत मोकळे मैदान ( esplanade ) आहे, त्यामध्ये माणसाच्या उंचीइतकी एकावर एक दगड टाकून रचाई केली आहे; त्यापैकी निम्मा भाग जमिनींत पुरलेला आहे आणि निम्मा भाग वर आहे. त्यामुळे कितीहि धीट पादचारी किंवा घोडेस्वार असला तरी तो बाहेरील तटबंदीपर्यंत सहजासहजीं जाऊं शकत नाहीं. तटाच्या उत्तरद्वारापासून दक्षिणद्वारापर्यंतचे अंतर खूप आहे, तितकेच अंतर पूर्व-पश्चिम द्वारामध्ये आहे. पहिल्या, दुस-या आणि तिस-या तटबंदीमध्ये मशागत केलेली शेते, बागा आणि घरे आहेत. तिस-यापासून सातव्या तटापर्यंत दुकाने आणि बाजार यांची गर्दी आहे.
'राजवाड्यापाशीं एकमेकांसमोर असे चार बाजार आहेत. उत्तरेस जे आहे ते रायाचे निवासस्थान किंवा सम्राटांचा प्रासाद होय. प्रत्येक बाजाराच्या अग्रभागीं भव्य कमानदार छत घातलेली वाट आणि विशाल गॅलरी आहे, परंतु त्या सर्वांपेक्षा राजवाडा अधिक भव्य आहे. बाजार खूप रुंद आणि लांब असून, आपल्या दुकानापुढे उंच कठडे असतांनाहि दोन्हीं बाजूंना फुले विकणारे फुले विकू शकतात. सुगंधित, मधुर नि ताजीं पुष्पे नगरांत केव्हांहि मिळतात किंबहुना ती आवश्यक आहेत असे मानले जाते. नागरिक त्याशिवाय राहूच शकत नाहींत. निरनिराळी कला किंवा उद्योग संघाचे व्यापारी आपली दुकानें जवळजवळ ठेवतात. मोतीवाले आपले मोती, लाल, हिरे, पाचू, प्रकटपणे बाजारात विकतात.'
अभ्यास:--हे दोन्ही उतारे वाचून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या १. विजयनगरचा घेर केवढा होता ? त्याला किती तट होते ? राज
[ २१
पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/137
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
