पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/131

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दंगेखोर काफर कैद्यांची कत्तल १० : : : दंगेखोर काफर कैद्यांची कत्तल [तैमूरचे आत्मचरित्र (मल्फुझत्-इ-तैमुरी) या ग्रंथांत तैमूरच्या ७ व्या वर्षापासून ते ७४ व्या वर्षापर्यंतची हकीकत आहे. * शाबानच्या १७ व्या तारखेस ( १९ मार्च १४०५ रोजी ) माझी शुद्ध गेली व देवाधीन झालों.' असा त्याच्या मृत्यूचा उल्लेख त्याच्याच आत्मचरित्रांत आहे, हे मोठे विचित्र वाटेल व कित्येकांनीं तेवढ्यावरून त्या आत्मचरित्राच्या विश्वसनीयतेबद्दल शंका व्यक्त केली आहे. पण माझ्या कृत्यांची हकीकत माझ्या अंतापर्यंत जणू काय मी कथन करीत आहे अशी लिहावी.' अशी त्याची आज्ञा होती. मूळ चघताई तुकी भाषेतील ग्रंथ अबुताले बहुसेनी याने इ. स. १६२८ त फारसीमध्ये भाषांतर करून शहाजहान यास अर्पण केला. या आत्मचरित्रांत व तैमूरच्या मृत्यूनंतर ३० वर्षांनीं शरफुद्दिन यज्दी याने लिहिलेल्या झफरनान्यांत ( तैमूर विजयग्रंथांत ) मोठे साम्य आहे. यावरून तमूरचे मूळ आत्मचरित्र तेव्हांच उपलब्ध असले पाहिजे असे म्हणता येईल. मोगल बादशाह बाबर व जहांगीर यांनींहि आत्मचरित्रे लिहिली. त्याच घराण्याचा मूळ पुरुष तैमूर हा होय. इ. व डौ. व्हॉ. ३ पृ ४३६.] हिंदुस्थानांत प्रवेश केल्यापासून आतापर्यंत आम्ही जवळजवळ लाख हिंदु गिरफदार केले असून ते सर्व या वेळेस छावणीमध्ये होते. काल शत्रूनी आम्हावर चाल केली तेव्हां त्यांनी आनंदप्रदर्शन केले. आम्हांस शिव्याशाप देण्यास प्रारंभ केला, आणि शत्रूच्या जयाची बातमी येऊन पोहोंचतांच आमच्या तंबू-राहुट्यांना आगी लावून शत्रूला साह्य करण्याची त्यांनी सिद्धता केली. यावर मी माझ्या अमीरांचा सल्ला विचारला असता त्यांनी सुचविलें कीं, (दिल्लीजवळ होणा-या) महत्त्वाच्या यद्धाचे वेळीं सामानांनी भरलेल्या आपल्या छावणीत हे एक लाख कैदी ठेवणे धोक्याचे आहे आणि त्यांना सोडून देणे हे तर नियमाविरुद्ध आहे; सारांश, त्या सर्वांना तलवारीच्या भक्ष्यस्थानी देण्याखेरीज दुसरा मार्गच नाहीं ! हे शब्द मी ऐकले तेव्हां ते मला युद्धनीतीस धरून आहेत असे वाटले, आणि मी त्वरित हुकूम दिला की, छावणींत असे जाहीर करा की, ज्या ज्या सैनिकांजवळ काफर कैदी असतील त्यांनी त्या कैद्यांना ठार मारले पाहिजे; तसे न केले तर त्या सैनिकाचा वध होईल व त्याची मालमत्ता गुन्हा हुडकून काढणारास मिळेल. हा हुकूम ७ सा. इ. | [ १५