पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/130

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास या पुस्तकाच्या पृ. १७९ वरील आहे. याचे मूळ इ. डौ. व्हॉ. ३, - पृ. ३८० वर पहा.] हिंदूंनीं व मूर्तिपूजकांनी आम्हीं कानाडोळा करावा म्हणून कर भरण्याचे पत्करलें होते आणि आपल्याला कसला उपसर्ग लागू नये म्हणून जिजिया कर भरण्याचेहि मान्य केले होते. पुढे या लोकांनी शहरांत व आजूबाजूस नवी देवळे बांधावयास आरंभ केला. महंमदी धर्माच्या अगदी विरुद्ध हे काम झाले. त्याचे तर असे सांगणे आहे कीं, असली देवळे होऊ देता कामा नये. दैवी इच्छा प्रमाण धरून मी ही मंदिरे पाडून टाकिली आणि काफिरशाहीचे पुढारी, की जे लोकांना पातकास प्रवृत्त करीत, त्यांना ठार मारून टाकलें व सटरफटर लोकांना फटकेमार दिला. शेवटी हा घाणेरडा प्रकार बंद पडला. उदाहरणादाखल सांगतों :--मल्लू नांवाच्या खेड्यांत एक तळे आहे, याला ते कुंड म्हणतात. येथे देवळे बांधलेली होती. विशेष प्रकारच्या दिवशीं सशस्त्र होऊन आणि घोड्यावर बसून हिंदु लोक तेथे जात असत. त्यांची बायका-मुलें पालखीतून किंवा गाड्यांतून जात व ते हजारोंनीं जमत व मूर्तीची पूजा करीत. या अनाचाराकडे इतका कानाडोळा झाला कीं, बनिया लोकांनी आपापल्या गोण्या भरून तेथे न्याव्या व बाजार थाटावा आणि माल विकावा असा प्रकार सुरू झाला. आपण कोण, काय हे विसरून केवळ पैका मिळावा म्हणून कांहीं मुसलमानहि तेथे जमू लागले. हें वर्तमान कळतांच माझ्या धर्मबुद्धिप्रमाणे मला वाटले की, इस्लामी धर्माची अप्रतिष्ठा करणारे आणि निदास्पद असे हे कृत्य थांबविलेच पाहिजे. मग जत्रेच्या दिवशी मी जातीनेच तेथे गेलों व हुकूम दिला कीं, या लोकांचे पुढारी आणि या गलिच्छ प्रकाराचे पुरस्कर्ते यांना ठार मारावे. सरसकट हिंदु लोकांना कांहीं कडक शासन करण्यास मीं प्रतिबंध केला; पण मी त्यांची देवळे उलथून टाकली आणि त्यांच्या जागी मशिदी बांधल्या. देवाच्या दयेने मूतपूजक आणि काफिर लोक मूर्तीची पूजा करीत असत तेथेच आज मुसलमान खया देवाची आराधना करीत आहेत. अभ्यास :--चर्चा करा : 'आजच्या नीतिनियमान्वये जुन्या पुरुषांची योग्यता ठरविणे कसे अयोग्य आहे ते हया आत्मगत लेखावरून स्पष्ट होत.


१४]