Jump to content

पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फिरोज सघ्लखचे आत्मकथन ९७ दिल्ली राजवाड्यांत आमचे स्वागत झाल्यावर दुस-या दिवशी आम्हांपैकी प्रत्येकास दरबारच्या पागेतून घोडे देण्यांत आले. खोगीर व जिनालेरीज विविध अलंकारांनी ते नटविलेले होते. सुलतानहि आमच्या समवेत घोड्यावर बसला. सुलतानाच्या डोक्यावर रत्नजडित छत्र धरलेले होते. त्याच्यापुढे ‘वर्षाव यंत्रे' ( Catapults ) हत्तीच्या पाठीवर चालविलीं होतीं. सुलतान जेव्हां राजधानीजवळ आला तेव्हां या यंत्रांतून गरीब लोकांसाठीं सोन्याचांदीच्या नाण्यांचा सडा पाडण्यांत येऊ लागला. राजवाड्यांत प्रवेश करीपर्यंत हा प्रकार चालू होता. | सुलतानाची आई ‘मलिका-इ-दुनिया' ‘जगाची मालकीण' या नांवानें ओळखली जाते. ती फार उदार असून प्रवाशांसाठी तिने सरायाहि बांधलेल्या आहेत. ती आंधळी आहे. तिचा पुत्र तिचा मोठा आदरसन्मान करतो. दर वर्षी ती त्याच्याबरोबर कोठे तरी प्रवासास जाते, तोहि तिच्याकडे जाऊन कांहीं दिवस राहतो. ती त्याच्याकडे जेव्हां येई तेव्हां ती पालखीत असतांनाच सुलतान आपल्या सिंहासनावरून खाली उतरून सामोरा जाऊन तिचे स्वागत करी व तिच्या चरणांवर डोके ठेवी. , अभ्यास :--१. महंमद तघ्लखाची पुढील मुद्याला धरून माहिती द्या--(अ) त्याचे शिक्षा देण्याचे प्रकार (आ) राजधानी बदलण्याचे एक कारण (इ) मातृभक्ति. २. महंमदाने आपली दैनंदिनी (डायरी) लिहिली असती तर या उतान्यांतील प्रसंग त्याने कसे वणले असते ते लिहा. ९ । । । फिरोज तघ्लखर्चे आत्मकथन [फुतुहत्-इ-फिरोजशाही या अवघ्या ३२ पृष्ठांच्या लेखांत फिरोज तुघ्लखाने निव्र्याज मनाने आपलें धोरण स्पष्ट करून सांगितले आहे. या लेखाची मूळ प्रत सांपडत नाहीं. जी सांपडते ती इ. स. १७२६ तील नक्कल होय. फिरोजशाहाला आपले वागणे सद्धर्माचे आहे असे वाटे व त्यास स्वत:च्या वागणुकीबद्दल मोठा अभिमान वाटत असे,असे या लेखावरून दिसते. प्रस्तुत उतारा प्रा. माटेकृत ‘आपापले हितगज' [१३