Jump to content

पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९६ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास मस्तक तोडले होते आणि वहिवाटीनुसार त्याचे शव तीन दिवसपर्यत जमिनीवर टाकून देण्यांत आले होते ! | ज्या एका गोष्टीबद्दल सुलतानाला विशेष दोष दिला जातो ती म्हणजे दिल्लीच्या नागरिकांवर आपली घरेंदारे सोडून (दौलताबादेस ) जाण्याची त्याने केलेली सक्ति. त्याचे कारण असे होते की, तेथील लोक पत्र लिहून सुलतानावर शिव्याशापांचा वर्षाव करीत आणि रात्रीच्या वेळीं असले कागदाचे तुकडे दरबारात फेकून देत ! तेव्हा त्याने दिल्ली शहरच उध्वस्त करण्याचे ठरविले ! त्याने घरे विकत घेतली आणि तेथील लोकांना देवगिरीस घालविले. जेव्हा त्यांनी विरोध सुरू केला, तेव्हां त्याने दवंडी पिटवून असे जाहीर केलें कीं, तीन दिवसांनंतर दिल्लीत एकहि माणूस दिसला तर पहा. याप्रमाणे पुष्कळ लोक दिल्ली सोडून गेले. कांहीं घरांत लपून राहिले होते त्यांना हुसकावून लावण्यांत आले. त्याच्या गुलामांना एक लंगडा व एक आंधळा मनुष्य रस्त्यांत सांपडला, त्याला दोघांना सुलतानापुढे उभे करण्यांत आलें ! लंगड्या माणसावर भडिमार यंत्रांतून (Catapult) वर्षाव करण्यांत आला व आंधळ्या माणसाला दौलताबादेला फरफटत नण्यांत आले. हा प्रवास चाळीस दिवसांचा होता. रस्त्याने त्याचे तुकडे तुकडे झाले; शेवटी त्याची एक तंगडी दौलताबादेस पोहोंचली. सर्व नागरिकांनी आपापली चीजवस्तु टाकून देऊन शहर खालीं केले, त्यामुळे तो दिल्ली नगरी पूर्णपणे निर्मनुष्य झाली. एका विश्वासू माणसाने मला सांगितले आहे कीं, (अशा कालांत) एके दिवशी संध्याकाळी सुलतान आपल्या राजवाड्याच्या गच्चीवर गेला व तेथून त्याने दिल्ली शहरांत पाहिले. शहरांतून कोठेहि अग्नि, धूर किंवा प्रकाश बाहेर येतांना दिसत नव्हता. हे पाहून तो म्हणाला " आतां माझा आत्मा शांत झाला आणि माझे मनहि संतुष्ट झालें ! " कांही दिवसांनीं भिन्न भिन्न प्रांतांतील लोकांस त्याने पत्रे पाठवून दिल्लीस राहण्यास बोलाविले. त्यांनी आपापली ठिकाणे उजाड केली व ते तेथे आले, परंतु त्यामुळे दिल्ली शहर भरू शकले. नाही. कारण ते शहरच विस्तीर्ण आहे. खरोखर जगांतील मोठ्या शहरांपैकीं हें एक होय. आम्ही जेव्हां तेथे आलो तेव्हां में शहर ओसाड, उध्वस्त झालेले आणि अगदी तुरळक वस्ती असलेले असे आढळले. या १२]