पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/127

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* महम्मद तघ्लखाचा स्वभाव ८ : महम्मद तलखाचा स्वभाव [ इब्न बतुता हा मोरोक्कोमधील टॅन्जीर्सचा रहिवासी. शेख अबदुल्ला मुहम्मद हे त्याचे मूळचे नांव. ‘इब्न बतुता' हे नांव त्याला मागाहून मिळाले त्याने इस्लामचीं पवित्र स्थळे पाहण्याच्या उद्देशाने त्रिखंडांत प्रवास केला. तो इ. स. १३३३ त १२ सप्टेंबरला हिंदुस्थानांत आला व इ. स. १३४२ पर्यंत या देशांत होता. येथे त्याने नुसता प्रवासच नव्हे तर आणखीहि ब-याच घालमेली केल्या. त्यास महम्मद तघ्लखाचे पदरीं न्यायाधीशाची जागा मिळाली. ते काम त्याने चोख बजावले. खेरीज त्यास सुलतानाने अनेक देणग्याहि दिल्या. आफ्रि केस गेल्यावर त्याने आपल्या टिपणावरून प्रवासवृत्त व इतिहास लिहिला. त्यांत शम्सुद्दिन इल्तमशपासून हकीकत आली आहे.

  • याचे लेखन निःस्पृह म्हणून विश्वसनीय आहे' हे एल्फिन्स्टनचे म्हणणे खरे आहे. पण कित्येक वेळां त्याने विश्वसनीय म्हणून मानलेल्या हकीकती तितक्या खरोखर विश्वसनीय नाहींत, कारण त्या केवळ तत्कालीन समजावर आधारलेल्या आहेत. इ. व डौ.व्हॉ. ३ पृ.६१]

सुलतानाची नम्रता, न्यायी वृत्ति, गरीबांवरील कृपा आणि आश्चर्य कारक औदार्य याबद्दल जे कांहीं सांगितले ते लक्षात घेऊनहि असे म्हणावेसे वाटते की, त्याच्या मनाचा ओढा रक्तपात करण्याकडे विशेष होता. त्याच्या राजवाड्याच्या दाराशीं एखादं प्रेत पडलें नाहीं, असें क्वचितच घडत असे पुष्कळ वेळेस मीं असे पाहिले आहे की, राजद्वाराशीं पुष्कळ लोकांचा संहार करण्यांत आलेला आहे आणि त्यांचीं प्रेते तेथे तशीच पडलेली आहेत ! एक दिवस मी तेथून जात असतां माझा घोडा थबकला. मी पाहू लागलों तों मला असे आढळलें कीं, जमिनीवर एक फिकट गोळा पडलेला आहे. तीन लकडे झालेले ते धड मनुष्याचे होते. लहान अपराधासाठी मोठ्या गुन्हयाला योग्य अशी शिक्षा राजा देत असे. असे करतांना विद्वान् , न्यायी किंवा प्रसिद्ध व्यक्तींवा तो मलाहिजा ठेवीत नसे. प्रत्येक दिवशी शेकडों लोकांना साखळ- . दंडाने बांधून राजसभेत उभे केले जाई, त्यांचे हात मानेशी जखडले जात आणि पायांत बेडी घातली जाई. कांहींचा वध केला जात असे. इतरांचा छळ होई किंवा त्यांना फटक्यांनीं झोडपण्यांत येत असे. त्याने आपल्या भावाचे [११