सुलताना रझियाची योग्यता ९३ क्वचितच वावरत असे. तरीसुद्धां ग्वाल्हेरचा विजय मिळवून परत आल्या-- वर सुलतानाने मुख्य सूत्रचालक मंत्र्याला बोलाविलें व त्याला तिचे नांव भावी राज्याचा वारस म्हणून नोंदण्यास सांगितले. हे फर्मान पूर्ण होण्यापूर्वी सरकारी नोकर त्याच्याकडे गेले व म्हणाले ‘‘राजपदाला योग्य मुलें राजास असतांना एका मुसलमानी सिंहासनावर मुलीस बसविणे यांत कोणता शहाणपणा आहे ? यामुळे कोणता फायदा होणार आहे ? या सर्व प्रश्नांसंबंधी आम्हांस उत्पन्न झालेली आशंका दूर करावी. त्यावर सुलतान म्हणाला, “माझी तरुण मुले तारुण्यांतील सुखांत रंगून गेली आहेत. त्यांच्यापैकी कोणाचेहि अंगीं राजकत्र्याचे गुण नाहींत. या प्रदेशावर राज्य करण्याला ते नालायक आहेत. माझ्या मृत्यूनंतर तुम्हांस असे आढळेल कीं, माझ्या मुलीखेरीज राज्याला योग्य मार्गदर्शक. दुसरा कोणीहि नाहीं." राजाचेच मत योग्य होते असे सर्वांना नंतर मान्य करावे लागले. अभ्यास :--१. सुलताना रझियाच्या अंगीं राज्यकत्र्यास लागणारे सर्व गुण होते, हे विधान सिद्ध करा. २. कांहीं भारतीय व विदेशी स्त्री राजकत्रच नांवें सांगा. ७ : अलाउद्दिनाचे राज्यव्यवस्थेचे व दारुबंदीचे प्रयोग [फिरोज तुलखाच्या कारकीर्दीत होऊन गेलेल्या झयाउद्दीन बर्नी या लेखकाने तारीख-इ-फिरोजशाही हा ग्रंथ लिहिला आहे. शम्स-इ-सिराज या लेखकाने याच नांवाचा दुसरा एक ग्रंथ लिहिला आहे. झियाउद्दीन याने तबकत-इ-नसिरी या ग्रंथाचे अखेरीपासून प्रारंभ । करून फिरोजच्या कारकीर्दीच्या पहिल्या सहा वर्षांपर्यंत म्हणजे सुमारे इ. स. १३५७ पर्यंत हकीकत आणून ठविली आहे. त्याची इतिहासाची कल्पना व्यापक आहे. त्यांत राज्यव्यवस्था, युद्धे व पुढीलांस बोध हे सांपडावे, असे तो म्हणतो. तो अगदी प्रारंभापासून इतिहास लिहिणार होता. पण तबकत-इ-नासिरी हा ग्रंथ त्यांच्या पाहण्यांत आल्यावर त्याने विचार केला की, आपण आणखी कांहीं निराळे लिहून अभ्यासकांना आंदेशा उत्पन्न कशाला करावा ? हे सर्व झियाउद्दीनाने लिहिले असले तरी तो मोठा विश्वसनीय लेखक नाहीं. फेरिस्ताने आपला ग्रंथः । [९
पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/125
Appearance