Jump to content

पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| सोमनाथाची अधांत्री मूत ६९ च्या टांकसाळींत पाडले गेले. जिन हजरत यांच्या आयना (पलायन) च। 'हिजरी संवत...... अभ्यास :--१. सुलतानाने आपल्या नाण्यांवर वरील मजकूर नागरी लिपींत कां खोदविला ? २. त्या वेळच्या भारतीयांच्या भाषा कोणत्या होत्या ? या भाषा कोणत्या लिपीत लिहिल्या जात ? । सोमनाथाची अधांत्री मूर्ति [ पुढील उतारा झकरिया–अल-काझविनी म्हणजे काझविनी गांवचा झकरिया याच्या लेखनांतून घेतला आहे. याचे इतिहासविषयक लेखन इतक्या योग्यतेचे आहे कीं, रोमन इतिहासकार प्लीनी याचेबरोबर त्याची तुलना करतात. झकरिया हा इराणांत इ. स. १२६३ चे सुमारास होऊन गेला. तो हिंदुस्थानांत आलेला नव्हता. त्याने इतरांच्या ग्रंथांवरून आपले लेखन केले आहे. इलियट अॅन्ड डौसन व्हॉ.१ पृ. ९४] । ..ती ( सोमनाथाची मूति ) मंदिराच्या मध्यभागी अधांत्री म्हणजे कोठेहि आधार नसलेली होती. हिंदु तिला फार पूज्य मानीत. सोमनाथाची ती मूर्ति पाहिल्यावर प्रत्येकास आश्चर्याचा धक्काच बसे, मग तो पाहणारा हिंदु असो वा मुसलमान असो. ग्रहणाचे वेळी तेथे हिंदूंची लाखावर यात्रा भरत असे. गझनीच्या महमुदाने ती मूर्ति पाहून आपल्या सहका-यांस विचारले * तुम्हांस काय वाटते ?' ते म्हणाले ‘या मूर्तीला नवकी कोठे तरी गुप्त आधार असलाच पाहिजे.' यावर सुलतानाने वर खालीं सर्वत्र चाचपून कोठे असा आधार आहे की काय ते पाहण्यास सांगितले. पण आधार आढळेना. यावर एका खिजमतगाराने कल्पना काढली कीं, ती मूत लोखंडाची असावी आणि वरचे छत व बाजूचा भाग हे लोहचुंबकाचे असावेत. मंदिराचे बांधकाम करणाराने एकंदरीत अशी योजना केली असावी कीं, मूर्तीस सर्व बाजूंनीं सारखेच आकर्षण असावे, म्हणजे ती सर्वत्र सारखीच आपली जाऊन अखेर अधांत्री टिकून राहील. त्याच्या या म्हणण्यास कोणी पाठिंबा [५]